भंडारा, दि.०८। प्रतिनिधी संजय राऊत आमच्या पक्षाचे प्रवक्ते नाहीत qकवा बाळासाहेब थोरात यांनी त्यांना नेमले असेल, तर मला माहित नाही, असा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी खासदार संजय राऊत यांना लगावला. पटोले यांनी भंडाèयात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. नाना पटोले यावेळी म्हणाले, राहुल गांधी यांनी काल सांगितले आहे की, संघटनेचे काम करा. या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देऊ नका. माझे काम जनतेच्या वेदना समजून त्यांना धीर देणे आहे. राज्यात काँग्रेसचे येणाèया काळात विविध कार्यक्रम होत आहेत. कसबा पोटनिवडणुकीची तयारी सुरू आहे. १५ तारखेला कार्यकारिणीची बैठक होत आहे. हाथ से हाथ जोडो कार्यक्रम सुरू आहे. भाजपने जनतेला ङ्कसवून घेतलेली सत्ता जनतेला कळायला लागली आहे. या सगळ्याची भीती निर्माण होणे साहजिकच आहे. काँग्रेस पक्षाचा वाद नाही, तर एका कुटुंबाचा वाद होता. तांबे कुटुंबातील वाद हा कौटुंबिक असताना भाजपने त्याचे राजकारण केले. सत्तापिपासू असलेल्या भाजपला विधानपरिषद निवडणुकीच्या माध्यमातून जनतेने धडा शिकवल्याची टीकाही पटोले यांनी यावेळी केली. बाळासाहेब थोरात यांची नाराजी दूर करणार का? या प्रश्नालाबाळासाहेब थोरात यांची नाराजी दूर करणार का? या प्रश्नाला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टाळले. नाना पटोले म्हणाले, १५ ङ्केब्रुवारीला काँग्रेस कार्यकारिणीची बैठक बोलावण्यात आली असून त्याचे निमंत्रण थोरात यांना देखील दिले आहे. मात्र, त्यांची मनधरणी करणार का याबाबत नाना पटोले यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही.