नवी दिल्ली, दि.०८। प्रतिनिधी महाराष्ट्राच्या खेळाडूंनी खेलो इंडियाच्या पाचव्या पर्वातही आपली मक्तेदारी राखली. सलग पाचव्या स्पर्धेत पदकांचे शतक ओलांडत महाराष्ट्राने या स्पर्धेतील आपले वर्चस्व सिद्ध केले. महाराष्ट्राने आता ३८ सुवर्ण, ३४ रौप्य आणि ३१ कांस्यपदके मिळवत १०३ पदकांसह आघाडी कायम राखली आहे. हरियाना, मध्य प्रदेश यांच्यात दुसèया क्रमांकासाठी रस्सीखेच कायम आहे. हरियाना (२५, २०, १८) अशा ६३ पदकांसह दुसèया, तर मध्य प्रदेश (२५, १३, २३) अशा ६१ पदकांसह तिसèया स्थानावर आहे. महाराष्ट्राला बुधवारी जलतरण आणि सायकqलगच्या सुवर्णपदकांनी बाजू भक्कम करता आली. अपेक्षा ङ्कर्नांडिसने जलतरणात, तर पूजा दानोळेने सायकqलगमध्ये सुवर्ण हॅटट्रिक साजरी केली. महाराष्ट्राच्या अपेक्षा ङ्कर्नांडिसने आज दोन, तर वेदांत माधवने एक सुवर्णपदक मिळवत आपली सुवर्णपदकांची संख्या वाढवली. अपेक्षाने २०० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक प्रकारात २ मिनिट ३९.८७ सेकंद अशी वेळ देत हे यश मिळविले.
पाठोपाठ अपेक्षाने १०० मीटर बटरफ्लाय प्रकारात १ मिनिट ०३.६९ सेकंद वेळ देत दुसèया सुवर्णपदकाची कमाई केली. वेंदातने आपल्या २०० मीटर ङ्क्री-स्टाईलच्या सुवर्णपदकात आज १५०० मीटर ङ्क्री-स्टाईल प्रकारात बाजी मारली. त्याने १६ मिनिटे १६.७४ सेकंद अशी वेळ दिली. १०० मीट बॅक स्ट्रोक शर्यतीत प्रतिक्षा डांगीने १ मिनिट ०८.९२ सेकंद वेळ देत सुवर्णपदक मिळविले. याच प्रकारात कोल्हापूरची भक्ती वाडकर १ मिनिट ०९.२३ सेकंदासह ब्राँझपदकाची मानकरी ठरली. मुलींच्या चार बाय १०० मीटर रिले शर्यतीत अनन्या नायक, दिप्ती तिलक, पलक जोशी, अपेक्षा ङ्कर्नांडिस या चमूला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. महाराष्ट्राच्या चमूने ४ मिनिट ०६.७१ सेकंद अशी वेळ दिली.कर्नाटकाने ४ मिनिट ०६.१० सेकंदासह सुवर्णपदक पटकावले.