नवी दिल्ली, दि.०८। प्रतिनिधी रिझव्र्ह बँक ऑङ्क इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी बुधवारी यंदाचं ( ८ ङ्केब्रुवारी) पतधोरण जाहीर केलं आहे. या नव्या पतधोरणामुळे आता सर्वसामान्यांना ‘जोर का झटका‘ लागला आहे. आरबीआयने यंदा रेपो रेटमध्ये ०.२५ टक्क्यांनी वाढ केल्याची घोषणा केली आहे. रेपो रेटमध्ये सलग सहाव्यांदा दरवाढ केली आहे. यामुळे रेपो रेट आता ६.५० टक्के झाला आहे. या धोरणाची घोषणा करताना आरबीआय गव्हर्नर म्हणाले की, महागाई हा देशातील qचतेचा विषय आहे. रेपो रेट वाढल्याने गृहकर्ज, कार कर्ज आणि वैयक्तिक कर्जाच्या ईएमआङ्मवर परिणाम होणार आहे.