नवी दिल्ली, दि.०८। प्रतिनिधी हिडनबर्ग रिपोर्टमुळे अदानींच्या साम्राज्याला आलेला भूकंप काही थांबायचे नाव घेत नाहीय. भारतीय शेअर बाजारात अदानींच्या शेअरला आज चांगला दिवस दिसला असला तरी ङ्क्रान्सच्या बड्या कंपनीने याच दिवशी मोठा झटका दिला आहे. तब्बल ५० अब्ज डॉलर्सचा प्रोजेक्ट या कंपनीने थांबविला आहे. अदानींच्य ा कंपन्यांमध्ये या कंपनीची मोठी गुंतवणूक आहे. अदानींसोबतच्या हायड्रोजन प्रकल्पातील भागीदारी ङ्क्रान्सच्या टोटल एनर्जी कंपनीने स्थगित केली आहे. अदानी समूहासोबतची भागीदारी गेल्या वर्षी जूनमध्ये जाहीर करण्यात आली होती. परंतू त्या करारावर अद्याप स्वाक्षèया केल्या नव्हत्या, असे ङ्क्रेंच समूहाचे मुख्य कार्यकारी पॅट्रिकपोयाने यांनी सांगितले.ढेींरश्र एपशीसळशी अदानी न्यू इंडस्ट्रीज लिमिटेड मध्ये २५ टक्के इक्विटी घेणार होती. ग्रीन हायड्रोजन इकोसिस्टम विकसित करण्यासाठी ५० अब्ज डॉलर्स गुंतवणुकीसह २०३० पर्यंत १० लाख टन हरित ऊर्जा निर्माण करण्याचे अदानी समूहाचे उद्दिष्ट आहे. त्याला मोठा धक्का बसला आहे. आमच्यासाठी गोष्टी स्पष्ट होईपर्यंत हायड्रोजन प्रकल्प थांबविला जाईल, असे स्पष्टपणे पोयाने यांनी सांगितले आहे. अदानी ग्रुपमध्ये ३.१ बिलियनची गुंतवणूक असलेली टोटल एनर्जी ही qहडनबर्ग रिपोर्टमुळे qचतेत आहे. लेखा आणि आर्थिक ङ्कसवणुकीच्या आरोपांमुळे अदानीच्या ऑडिट रिपोर्टची वाट पाहत आहे. मिस्टर अदानी यांच्याकडे सध्या इतर अनेक गोष्टी हाताळण्यासारख्या आहेत. त्यामुळे ऑडिट चालू असताना भागीदारी निलंबित करणे चांगले होईल, असे ङ्क्रेंच कंपनीने म्हटले आहे.