युरोपच्या सर्वात मोठ्या संसदेत पोहोचले झेलेन्स्की भावूक होत म्हणाले- युक्रेनचा विजय व्हावा

युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमीर झेलेन्स्की गुरुवारी युरोपची सर्वात मोठी संसद युरोपियन युनियनच्या पार्लमेन्टमध्ये पोहोचले. इथे त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात ‘युक्रेनचा विजय होवो‘ या नाèयासह केली. युद्धाला एक वर्ष पूर्ण व्हायच्या ठिक १५ दिवस आधीच्या भाषणात झेलेन्स्कींनी रशियावर जोरदार प्रहार केला. यादरम्यान युरोपियन युनियनच्या खासदारांनी त्यांना दोन वेळा स्टँqडग ओवेशन दिले. आपल्या भाषणात झेलेन्स्कींनी घोषणा केली की, युक्रेन युरोपियन युनियनचा सदस्य राहील. ज्याविरोधात रशिया अनेक वर्षांपासून युद्धाचा इशारा देत आला आहे. युरोपियन युनियनच्या संसदेत दिलेल्या भाषणात झेलेन्स्कींनी युक्रेनची मदत करणाèया युरोपियन नेत्यांचे आभार मानले. रशिया केवळ युक्रेनच नव्हे तर जीवन जगण्याच्या युरोपच्या पद्धतींवरही हल्ला करत असल्याचे ते म्हणाले. झेलेन्स्कींनी पुतिन यांच्यावर युरोपची शांतता भंग करण्याचा आरोप करत म्हटले की, आम्ही असे कदापिही होऊ देणार नाही.

पुतिन एक हुकुमशहा आहे जे सोव्हिएत शस्त्राचा वापर करून आपला हेतू पूर्ण करू इच्छितात. झेलेन्स्कींनी असेही म्हटले की, यामुळे ङ्करक पडत नाही की आम्ही कोण आहोत, पण आम्हाला आमच्या सन्मानासाठी लढावे लागेल. आमची मुले आणि त्यांच्या मुलांच्या स्वप्नांसाटी सर्वात आधी त्यांचे संरक्षण गरजेचे आहे. आम्ही कोणत्याही परिस्थितीत रशियाला आपला युरोप हिसकावण्यात यशस्वी होऊ देऊ शकत नाही. आपले भाषण संपल्यानंतर झेलेन्स्कींना युरोपियन युनियनच्या अध्यक्ष रॉबर्टा मेटसोलांनी ध्वज देऊन सन्मानित केले. यानंतर झेलेन्स्कींनी अधिकृतरित्या युरोपियन युनियनमध्ये सहभागासाठीचा अर्ज केला. बीबीसीनुसार जूनमध्ये युक्रेनला युरोपियन युनियन सदस्यत्वाचा दर्जा मिळेल. युरोपियन युनियनमध्ये भाषणापूर्वी झेलेन्स्कींनी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक, ङ्क्रान्सचे राष्ट्रपती एमॅन्युएल मॅक्रोन आणि जर्मनीचे चान्सलर ओलाङ्क शॉल्झ यांची भेट घेतली. झेलेन्स्कींनी रशियाला कठोर आव्हान देण्यासाठी ङ्क्रान्स आणि जर्मनीला लवकरात लवकर ङ्कायटर जेट आणि मोठी शस्त्रे पाठवण्याची विनंती केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *