विकसित भारतासाठी मातृभाषेतूनच शिक्षणाची गरज : पंतप्रधान मोदी

प्रतिनिधी युवा पिढीला पुढे नेणारी धोरणे शासनाकडून राबवली जात आहेत. कोणत्याही समाज घटकातील विद्यार्थी शिक्षणात मागे पडू नये यासाठी शैक्षणिक धोरणात बदल करून मातृभाषेतून शिक्षणाला महत्त्व दिले जात आहे, असे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले. अंधेरी मरोळ येथील ‘अलजामिया-टस-सैङ्किया‘ अरेबिक शैक्षणिक संस्थेच्या उद्घाटनप्रसंगी प्रधानमंत्री श्री. मोदी बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ qशदे, विधानसभेचे अध्यक्ष अ‍ॅड. राहुल नार्वे कर, उपमुख्यमंत्री देवेंद्र ङ्कडणवीस, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, ‘अलजामिया-ट स-सैङ्कि या ‘च े कुलगुरू डॉ. सय्यदन मुङ्कद्दल सैङ्कउद्दीन, दाऊदी बोहरा समाजाचे शहजादा अलिअसगर कलीम ऊद्दीन, शहजादा कियदजोहर इज इज्जुद्दीन तसेच दाऊदी बोहरा समाजबांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. प्रधानमंत्री श्री. मोदी म्हणाले की, दाऊदी बोहरा समाजाच्या चार पिढ्यांसोबत माझा संवाद आहे. कोणताही समाज काळानुसार कसा बदलतो करतो यावरच त्या समाजाचा विकास अवलंबून असतो. दाउदी बोहरा समाज ही काळाप्रमाणे बदलत आहे.

काळाप्रमाणे नावीन्यपूर्ण शिक्षणाची कास धरत आहे. ही आनंदाची बाब आहे. ‘अलजामिया- टस-सैङ्किया‘ ही देशातील दुसरी अरेबिक शैक्षणिक संस्था स्थापन झाली या समाजाचे हे १५० वर्षांपूर्वीचे स्वप्न आज साकार झाले आहे. गुजरात सुरत येथील संस्थेचे माजी कुलपती डॉ. मोहम्मद बुरहानुद्दीन यांचे काम मी पाहिले आहे. नव्या पिढीला शिक्षण देण्यासाठी ते आग्रही होते. सूरत येथे त्यांनी कुपोषण आणि जलसाक्षरतेसाठी काम केले. त्यांची सक्रियता ही ऊर्जा देणारी होती. आजही मला या समाजाच्या आजच्या पिढीकडून आपल्याला प्रेम मिळत आहे. हे प्रेम खूप मोलाचे आहे, असेही प्रधानमंत्री म्हणाले. प्रधानमंत्री श्री. मोदी म्हणाले की, दाउदी बोहरा समाज बांधव जगाच्या कुठल्याही देशात असले तरी देशाप्रती त्यांचे प्रेम आणि योगदान खूप आहे आणि भविष्यातही राहील. शिक्षण क्षेत्रातही या समाजाचे खूप मोठे योगदान आहे. शिक्षणाविषयी स्वप्न पाहिल्यानंतर ते प्रयत्न करून पूर्ण करण्याची क्षमता या समाजामध्ये आहे ‘अलजामिया-टस-सैङ्किया‘ या अरेबिक शिक्षण संस्थेत महिलांच्या शिक्षणासाठी प्रयत्न करण्यात येतया अरेबिक शिक्षण संस्थेत महिलांच्या शिक्षणासाठी प्रयत्न करण्यात येत आहे ही चांगली गोष्ट आहे. यापुढेही महिलांचा विकास, महिलांना आधुनिक शिक्षण देण्यासाठी ही संस्था आपले योगदान देईल, अशी मला आशा आहे.

शासनाकडून युवा पिढीला पुढे नेणारी धोरणे राबवली जात आहेत असेही प्रधानमंत्री श्री. मोदी यावेळी म्हणाले. प्रधानमंत्री श्री. मोदी पुढे म्हणाले की, विद्याथ्र्यांमध्ये कौशल्ययुक्त शिक्षण घेणे ही काळाची गरज आहे. शिक्षण आणि उद्योग क्षेत्र हे दोन्हीही पूरक असले पाहिजेत, अशी धोरणे राबवत आहोत. दाऊदी बोहरा समाज उद्योग क्षेत्रात आघाडीवर आहे. या उद्योजकांसाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल.उद्योगासाठी कर प्रणाली मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. शासनाच्या धोरणामुळे नोकरी देणारे तयार होत आहेत. विकास करीत असताना हे शासन वारसा आणि आधुनिकता बरोबर घेवून पुढे जात आहे. देश पारंपरिक संस्कृतीला आधुनिकतेची जोड देण्यात येत आहे. सण उत्सवांना आधुनिकतेची जोड देण्यात आली आहे. जुन्या ग्रंथांचे डिजिटलायझेशन केले जात आहे. सरकार पर्यावरणावर भर देत आहे. आंतरराष्ट्रीय पौष्टिक भरड धान्य वर्ष साजरे करत आहे. जी २० परिषदेचे अध्यक्षपद भारताला मिळालेला आहे हा मोठा बहुमान आहे.दाऊदी बोहरा समाजातील प्रत्येक नागरिक जो जागतिक पातळीवर आहे तो आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशाचे नाव पुढे नेईल, अशी आशा व्यक्त करतो असेही प्रधानमंत्री श्री. मोदी म्हणाले. यावेळी ‘अलजामिया-टस-सैङ्किया‘ शैक्षणिक संस्थेची माहितीवर आधारित ध्वनी चित्रङ्कित दाखवण्यात आली. दाउदी बोहरा समाजाच्या स्वागत गीताने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *