मौलाना अर्शद मदनीच्या विधानावर संतापले धर्मुगुरु

नवी दिल्ली, दि.१२। वृत्तसंस्था दिल्लीतील राम लीला मैदानावर आयोजित जमियत-ए-उलेमा- ए-qहदच्या कार्यक्रमात रविवारी मौलाना अर्शद मदनी यांच्या एका विधानावर मोठा वाद झाला. मौलाना मदनी म्हणाले की, तुमचे पूर्वज qहदू नव्हते. ते मनु म्हणजे आदम होते. ते एवढ्यावरच थांबले नाही. ते पुढे म्हणाले की, ओम व अल्लाह एकच आहेत. मदनींच्या या विधानावर अनेक धर्मगुरुंनी आक्षेप नोंदवत व्यासपीठ सोडले. सरसंघचालक मोहन भागवत यांनी नुकतेच qहदू व मुस्लिमांचे पूर्वज एकच असल्याचे वादग्रस्त विधान केले होते. मदनी यांनी त्यांच्या विधानावर भाष्य करताना उपरोक्त वादग्रस्त विधान केले. दिल्लीच्या रामलीला मैदानावर जमियत उलेमा-ए-qहदच्या ३४ व्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मौलाना मदनी म्हणाले – मी विचारले की तेव्हा कुणीही नव्हते. ना श्रीराम, ना ब्रह्मा, ना शिव… तेव्हा कुणीही नसताना मनुने कुणाची पूजा केली? असा माझा प्रश्न आहे. कुणी ते महादेवाची पूजा करत होते असे सांगतात. तर काही जण मनुने ओमची पूजा केल्याचा दावा करतात. ओम कोण आहे? अनेकांनी सांगितले की, त्याला कोणतेही रूप qकवा रंग नाही. ते जगात सर्वत्र आहेत. अरे बाबा, याला आपण अल्लाह म्हणतो. तुम्ही त्याला देव म्हणता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *