दौसा, दि.१२। वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्ली-मुंबई महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन झाले. हा महामार्ग देशातील सर्वात लांब महामार्ग असल्याचे बोलले जात आहे. या एक्सप्रेसवेच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केल्यानंतर पंतप्रधान मोदींनी उपस्थितानां संबोधित केले. गेल्या ९ वर्षांपासून आम्ही पायाभूत सुविधांवर मोठी गुंतवणूक करत आहोत. आज दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवेचा पहिला टप्पा देशाला समर्पित करताना मला खूप अभिमान वाटत आहे. हा देशातील सर्वात मोठा आणि आधुनिक द्रुतगती मार्गांपैकी एक आहे. हे विकसित भारताचे आणखी एक भव्य चित्र आहे.
यंदाच्या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांसाठी दहा लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे. ही रक्कम २०१४ मध्ये तरतूद केलेल्या रकमेच्या पाचपट आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले. पंतप्रधान मोदी म्हणाले, आधुनिक रस्ते, आधुनिक रेल्वे स्थानके, रेल्वे ट्रॅक, मेट्रो आणि विमानतळ बांधले जात आहेत. त्यामुले देशाच्या प्रगतीला गती मिळत आहे. पायाभूत सुविधांवरील गुंतवणूक आणखी गुंतवणूक मिळण्यासाठी ङ्कायदेशीर ठरते. त्यामुळेच केंद्र सरकार पायाभूत सुविधांवर सातत्याने मोठी गुंतवणूक करत आहे. पंतप्रधान पुढे म्हणाले की, दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे आणि वेस्टर्न डेडिकेटेड ङ्क्रेट कॉरिडॉर हे राजस्थान आणि देशाच्या प्रगतीचे दोन मजबूत स्तंभ बनणार आहेत. या प्रकल्पांमुळे आगामी काळात राजस्थानसह संपूर्ण प्रदेशाचे चित्र बदलणार आहे.