मुंबई , दि.१२। प्रतिनिधी भांडुप येथील qखडीपाडा परिसरात आज सकाळी घराचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. बीएमसी अधिकाèयांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना आज सकाळी ९.४२ वाजता घडली. इमारतीच्या दुरुस्तीचं काम सुरू असताना ही घटना घडल्याचे कळतंय. प्राथमिक माहितीनुसार, ग्राउंड प्लस वन स्ट्रक्चरच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना ही घटना घडली.
स्लॅबचा काही भाग आगांवर कोसळल्याने राजकुमार धोत्रे वय १९ वर्षे आणि रामानंद यादव वय १८ वर्षे हे दोन तरूण गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ जवळच्या एमटी अग्रवाल रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. दरम्यान या संदर्भात भांडुप पोलिसांनी संबधितावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.