मुंबई, दि.१२। प्रतिनिधी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज गोरेगाव येथील नाहर qसह परिवाराच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमात उत्तर भारतीय समुदायाला उद्धव ठाकरे यांनी संबोधित केले. या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. ‘qहमत असेल तर सर्व निवडणुका एकत्र घेऊन या, आम्ही तयार आहोत, असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी यावेळी qहदुत्वाच्या मुद्यावर भाजपवर टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मन की बातवरुन टोला लगावला आहे. उत्तर भारतीयांशी सेनेचं नातं मजबूत करण्यासाठी मी आलो, असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. उत्तर भारतीयांचा मेळावा नसू ही बैठक आहे. मेळाव्याला मैदान कमी पडेल, असं ठाकरे म्हणाले. लोकांना आता मन की बात नको असून दिल की बात हवीय, असा टोला देखील उद्धव ठाकरे यांनी लगावला. संपूर्ण देशाला भाजपचं qहदुत्व काय हे समजून घ्यायचं आहे. आम्ही भाजपशी २५-३० वर्ष राजकीय मैत्री निभावली, पण आम्हाला काय मिळालं. भाजपवाले केंद्रात सत्तेत बसल्यावर त्यांना ज्यांनी तिथपर्यंत पोहोचवलं मग अकाली दल असो आणि शिवसेना त्यांना नकोसे झाले.भाजपचे वाईट दिवस होते त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांना वाचवलं होतं, असं उद्धव ठाकरे म्हणाले. बाळासाहेब ठाकरे यांनी जो देशद्रोही असेल मग कोणत्याही धर्माचा असेल त्याला शिक्षा मिळाली पाहिजे असा विचार मांडला. आम्ही भाजपची साथ सोडली, qहदुत्व सोडलेलं नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतqसह कोश्यारी यांच्यावर टीका देखील केली.