अमरावती, दि.१३। प्रतिनिधी शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह कोणाचं? यावरून उद्धव ठाकरे आणि एकनाथ qशदे गटात मागच्या वाद सुरू आहे. शिवसेना आणि धनुष्यबाण कोणाचा? यावरील सुनावणी सुप्रीम कोर्टात १४ ङ्केब्रुवारीपासून होणार आहे. मात्र, याआधीच माजी मंत्री आणि आमदार बच्चू कडू यांनी निर्णयासंदर्भात भाकीत केलं आहे. भावनेवर निर्णय होत नाही तो कागदावर निर्णय होतो. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ qशदे यांच्या बाजूनेच निर्णय लागेल, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली. अमरावती येथे बच्चू कडू यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण कोणाचा? यावर उद्या (१४ ङ्केब्रुवारी) सुप्रीम कोर्टात निर्णय होणार आहे. यावर qशदे गटाचे आमदार बच्चू कडू यांनी अमरावतीत प्रतिक्रिया दिली. चिन्हापेक्षा मत कोणाला आहे हे महत्त्वाचं असते. एकनाथ qशदे यांची मजबूत तयारी आहे. परिपूर्ण कागदपत्र त्यांच्याकडे आहे. भावनेवर निर्णय होत नाही, तो कागदावर होतो. त्यामुळे एकनाथ qशदे यांच्या बाजूनेच निर्णय लागेल अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली.
बुलढाणा येथे शेतकèयांसाठी आंदोलन केल्याने रविकांत तुपकर यांच्यावर दंगलीचे गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली. यावर आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली. व्यवस्थेचा दोष आहे. कायद्यात दुरुस्ती करणे आवश्यक असून यासाठी नव्याने कायद्या आणण्याची आवश्यकता आहे. शेतकèयावर दंगलीचे गुन्हे लावले तर त्या ठाणेदार व अधिकाèयाला भोगावे लागेल. वेळ आली तर तिथं उपस्थित राहू, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली आहे. सर्वोच्च न्यायालयात देखील राज्यातील सत्ता संघर्षावर सुनावणी सुरू आहे. येत्या १४ ङ्केब्रुवारीपासूनसर्वोच्च न्यायालयात देखील राज्यातील सत्ता संघर्षावर सुनावणी सुरू आहे. येत्या १४ ङ्केब्रुवारीपासून या प्रकरणावर सलग सुनावणी होणार आहे. निवडणूक आयोग जोपर्यंत सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निर्णय देत नाही तोपर्यंत कुठलाही निर्णय देणार नसल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षासंदर्भात येत्या १४ ङ्केब्रुवारीला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.