पुढचा नंबर भारताचा?

नवी दिल्ली, दि.१३। वत्त्ृ ासस्ं था टर्कीमध्ये महाप्रलयकारी भूकंपाने जगाला मोठा हादरा बसला आहे. या भूकंपात आतापर्यंत ३३ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. या भूकंपाच्या तीन दिवस आधी नेदरलँडमधील एका संशोधकाने महाप्रलयकारी भूकंपाचा अंदाज वर्तवला होता. डच रिसर्चर ङ्क्रँक हूगरबीट्स यांनी आता भारतासह, अङ्कगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या आसपासच्या प्रदेशात भूकंपाचे मोठं धक्के बसतील असा अंदाज वर्तवला आहे. ङ्क्रँक हूगरबीट्स यांनी टर्कीमध्ये ७.५ मॅग्निट्युड क्षमतेच्या भूकंपाचा अंदाज वर्तवला होता. परंतु त्यांना कोणी ङ्कारसं गांभीर्याने घेतलं नाही. तीन दिवसांनी टर्की आणि सीरियात विध्वंसकारी भूकंप आल्यानंतर सर्वांना हूगरबीट्स यांची आठवण झाली.

हूगरबीट्स यांनी एका भारतीङ्म वाहिनीशी बोलताना सांगितलं की, ते ग्रहांच्या हालचालींच्या आधारावर भूकंपाची भविष्यवाणी करतात. तसेच ते सोलार सिस्टिम ज्योमेट्री सर्वेसाठी काम करत आहेत. डडॠएजड ही एक संशोधन संस्था आहे जी भूकंपाबद्दलची माहिती घेण्यासाठी खगोलीय वस्तूंचे निरीक्षण करते. ङ्क्रँक म्हणाले की, मी टर्कीतल्या भूकंपाचा अंदाज वर्तवू शकलो कारण मी त्यावर बरंच संशोधन केलं आहे. भूकंपासंबंधी गोष्टी घडतील असा अंदाज वर्तवला होता. परंतु तीन दिवसांनी भूकंप येईल हे मला माहिती नव्हतं. आता ङ्क्रँक यांनी अङ्कगाणिस्तान, पाकिस्तान आणि भारतासह qहद महासागरात मोठ्या भूकंपाची भविष्यवाणी केली आहे. ङ्क्रँक म्हणाले की, या भूकंपाबद्दल थोडा संभ्रम आहे. कारण अजून एक गोष्ट स्पष्ट झालेली नाही की, भूकंप अङ्कगाणिस्तानपासून सुरू होऊन qहदी महासागरापर्यंत जाईल. २००१ प्रमाणे भारतावर या भूकंपाचा परिणाम होईल होईल असं वाटतंय, परंतु त्याबद्दल ठोस माहिती नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *