तामिळ फुटीरवादी संघटना लिबरेशन टायगर्स ऑङ्क तामिळ इलमचा प्रमुख वेलुपिल्लई प्रभाकरण जिवंत असल्याचा धक्कादायक दावा वल्र्ड तामिळ ङ्केडरेशनचे अध्यक्ष नेदुमारन यांनी केला आहे. प्रभाकरण जिवंत आहे, ते सुखरुप आहे आणि लवकरच सर्वांसमोर येतील, असं त्यांनी सांगितल्याने खळबळ उडाली आहे. नेदुमारन यांनी म्हटले की, मी ङढढए प्रमुख वेलुपिल्लई प्रभाकरणबद्दल काही सांगू इच्छितो. ते जिवंत आहेत आणि सुखरूप आहेत. आम्हाला विेशास आहे की यामुळे त्यांच्याबद्दल सुरु असलेल्या अङ्कवांना पूर्णवराम लागेल. तामिळनाडू तंजावुरजवळ विलारमध्ये मुलिवैकल मेमोरियल यार्डमध्ये पत्रकारपरिषद घेत नेदुमारान यांनी प्रभाकरण लवकरच सर्वांसमोर येण्याची शक्यता वर्तवली आहे. २००९ साली एलटीटीईचा म्होरक्या प्रभाकरनसोबतच या संपूर्ण संघटनेच्या मुसक्या आवळण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आलं होतं. त्यामुळे दक्षिण भारतात, विशेषत: तामिळनाडू आणि आसपासच्या भागातील नागरिकांनी सुटकेचा नि:ेशास टाकला होता. मात्र, आता नेदुमारान यांनी केलेल्या या धक्कादायक दाव्यामुळे पुन्हा खळबळ उडाली आहे. प्रभाकरनला १८ मे २००९ रोजी श्रीलंकन सरकारने मृत घोषित केले होते. तो १७ मे २००९ रोजी देशाच्या उत्तर भागात झालेल्या एका चकमकीत मारला गेल्याचा दावा सरकारने केला होता. त्यानंतर दुसèयाच दिवशी त्याचा मृतदेह श्रीलंकन मीडियावरही दाखवण्यात आला होता. त्यानंतर आठवड्याभराने लिट्टेचा प्रवक्ता सेल्वारासा पथ्मनाथान यांनी प्रभाकरनच्या मृत्यूची पुष्टी केली होती. तद्नंतर २ आठवड्यांनी डीएनए टेस्टमध्येही हा मृतदेह प्रभाकरनचाच असल्याची पुष्टी झाली होती.