लंडन । इंग्लंडचा दिग्गज क्रिकेटपटू इऑन मॉर्गनने सर्व प्रकारच्या व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. इंग्लंडने २०१९ साली विेशचषक स्पर्धा qजकली होती. या स्पर्धेत मॉर्गनने इंग्लंड संघाचे नेतृत्व केले होते. इंग्लंडा क्रिकेटपटू इऑन मॉर्गनने क्रिकेटच्या सर्व ङ्कॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. आपण निवृत्त झाल्याचे जाहीर करताना त्याने खेळापासून दूर होण्याची हीच खरी वेळ आहे, असे सांगितले आहे. इऑन मॉर्गनचे क्रिकेटमधील करिअर एकूण १६ वर्षे राहिले. मॉर्गनने एकदिवसीय क्रिकेटसाठी इंग्लंडच्या टीमचे यशस्वी नेतृत्व केले. मॉर्गनच्या नेतृत्वातच इंग्लंडलने २०१९ साली पहिल्यांदाच क्रिकेट विेशचषकावर आपले नाव कोरले. मॉर्गनने १२६ एकदिवसीय सामन्यात इंग्लंडच्या टीमचे नेतृत्व केले. यापैकी ७६ सामन्यांत इंग्लंडचा विजय झाला होता.