संगमनेर , दि.१३। प्रतिनिधी नाशिक पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीवरुन चांगलाच वाद पाहायला मिळाला होता. यामुळे काँग्रेसमधील गटबाजीही चव्हाट्यावर आली होती. या सगळ्या वादानंतर आज सत्यजित तांबे यांच्याकडून संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. यामध्ये काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि सत्यजित तांबे यांचे संगमनेरमध्ये जल्लोशात स्वागत करण्यात आले. उपचारानंतर पहिल्यांदाच थोरात संगमनेरमध्ये आले आहेत, यावेळी बोलताना बाळासाहेब थोरात यांनी सत्यजित तांबेंच्या वादावर महत्वाचे विधान केले आहे. यावेळी बोलताना बाळासाहेब थोरात यांनी, भारत जोडो यात्रा संपुर्ण देशभरात गेली मात्र सर्वात सुंदर नियोजन महाराष्ट्रात झाले असे म्हणत राहुल गांधी यांच्या शेगावमधील सभेचे जोरदार कौतुक केले.