फडणवीस सुज्ञ आहेत – पवार

मुंबई  दि.१३। प्रतिनिधी शरद पवारांशी चर्चा करूनच आम्ही राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन करूनसकाळचा शपथविधी केला या देवेंद्र फडणवीसांच्या गौप्यस्फोटाने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. यावर ”देवेंद्र फडणवीस सुसंस्कृत, सुज्ञ माणूस आहे, असत्याचा आधार घेवून अशा प्रकारचे स्टेटमेंट ते करतील असे वाटले नाही. अशी प्रतिक्रीया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. आज ते माध्यमांशी बोलत होते. पहाटेचा शपथविधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्μयक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करूनच झाला होता असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. फडणवीसांच्या या गौप्यस्फोटानंतर शरद पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. मला वाटतं देवेंद्र फडणवीस हे सुसंस्कृत आणि सभ्य माणूस आहेत. ते असत्याचा आधार घेऊन अशी वक्तव्य करतील अस मला कधी वाटलं नाही, अशा शब्दात पवारांनी फडणवीसांना प्रत्युत्तर दिले आहे.

कोणत्या आधारावर फडणवीसांनी हे वक्तव्य केल्याचे विचारले असता तुम्ही त्यांना विचारा अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली. तसेच देवेंद्र फडणवीसांनी केलेला गौप्यस्फोट असत्य म्हणजेच खोटा असल्याचे पवार यांनी म्हटले आहे. दरम्यान देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीविषयी फडणवीसांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. सकाळच्या शपथेविषयी शरद पवार साहेबांशी चर्चा झाली होती. त्यांच्याशी चर्चा करूनच शपतविधी झाला होता असा गौप्यस्फोट फडणवीस यांनी केला आहे. यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. २३ नोव्हेंबर २०१९ च्या सकाळी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घटना घडली होती. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. परंतु हे सरकार ७२ तासांमध्येच कोसळलं. त्यानंतर राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचं महाविकासआघाडी सरकार आलं. त्यानंतर पहाटेच्या शपथविधीविषयी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आतापर्यंत स्पष्ट वक्तव्य केले नसली तरी फडणवीस यावर स्पष्टच बोलले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *