नवी दिल्ली, दि.१३। प्रतिनिधी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्याचा आज शेवटचा दिवस आहे. राज्यसभेचे कामकाज १३ मार्चपर्यंत तहकूब करण्यात आले आहे. qहडेनबर्ग अहवालावर विरोधी खासदारांनी जेपीसीची मागणी करत गदारोळ केला. त्यानंतर सभागृहाचे कामकाज तहकूब करावे लागले. qहडेनबर्गच्या अदानी समूहावरील अहवालाबाबत विरोधक सातत्याने जेपीसीची मागणी करत आहेत. अधिवेशनापूर्वी १४ विरोधी पक्षांच्या नेत्यांनी राज्यसभा खासदार मल्लिकार्जुन खरगे यांची संसदेच्या दालनात भेट घेतली होती.दरम्यान, लोकसभा सचिवालयाने काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना नोटीस बजावली आहे. भाजप खासदार निशिकांत दुबे आणि संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या विशेषाधिकार भंगाच्या नोटिशीवर सचिवालयाने राहुल गांधींकडून उत्तर मागितले आहे. लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना १५ ङ्केब्रुवारीपर्यंत या नोटिशीला उत्तर देण्यास सांगितले आहे.
लोकसभेत राहुल यांना दिलेल्या नोटीसवर खरगे म्हणाले की, राहुल गांधी जे काही संसदेत बोलले तेलोकसभेत राहुल यांना दिलेल्या नोटीसवर खरगे म्हणाले की, राहुल गांधी जे काही संसदेत बोलले ते आधीच सार्वजनिक डोमेनमध्ये आहे, ते तेच बोलले आहेत जे प्रत्येकजण बोलतो आणि लिहितो. यात असंसदीय काहीही नाही. त्यामुळे ते त्यानुसार नोटीसला उत्तर देतील. राज्यसभेत विरोधी पक्षाच्या खासदारांनी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्यावर सरकारच्या दबावाखाली काम केल्याचा आरोप केला. राज्यसभेत विरोधी पक्षाच्या खासदारांनी उपराष्ट्रपतींवर दबावाखाली काम केल्याचा आरोप केला. यावर सभापती धनखड संतापले. ते म्हणाले- विरोधी पक्षनेते, तुम्ही अनेकवेळा सूचित केलेत की सभापती दबावाखाली काम करत आहेत. हे शब्द हटवले आहेत. तुम्ही सभागृहा उपस्थित राहण्याच्या तुमच्या अधिकाराचे उल्लंघन करत आहात. प्रत्येक वेळी सभापती दबावाखाली काम करत असल्याचे सांगत आहात. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा १३ मार्चपासून सुरू होणार असून ६ एप्रिलपर्यंत चालणार आहे. दुसèया टप्प्यात वित्त विधेयकावर संसदेच्या दोन्ही सभागृहांत चर्चा होईल, त्यानंतर हे विधेयक दोन्ही सभागृहांतून मंजूर होईल.