पहाटेचा ‘तो‘शपथविधी पवारसाहेबांच्या सहमतीनेच

मबुं इर्, दि.१३। प्रतिनिधी भाजपचे देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीनंतर महाराष्ट्रात दीड दिवसाचं सरकार स्थापन झालं होतं. त्यानंतर या पहाटेच्या शपथविधीबाबत देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह दोन्ही पक्षांचे बडे नेते बोलणे टाळत आले आहेत. आज मात्र या शपथविधीप्रकरणी ङ्कडणवीस यांनी अत्यंत खळबळजनक विधान केलं आहे.पहाटेच्या शपथविधीबाबत मध्यंतरी वंचितचे प्रकाश आंबेडकर आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पवार यांनी वक्तव्ये केली होती. जयंत पवार यांनी त्यानंतर सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आज खुद्द फडणवीस यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. त्यामुळं महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळासह मोठी खळबळ उडाली आहे.

फडणवीस म्हणाले. त्या शपथविधीबाबत आमची चर्चा पवारसाहेबांशी झालेली होती. बाकी सगळ्या गोष्टी अजित पवारांना विचारा, मला का विचारता. यानंतर अजित पवार याबाबत बोलणं टाळतात, त्यामुळं तुम्हीच सांगा असं विचारण्यात आले. त्यावर, ज्यावेळी अजित पवार बोलतील त्यानंतर मी सविस्तर सांगेन, असाही दावा फडणवीस केला. भाजपचे देवेंद्र ङ्कडणवीस आणि राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी २३ नोव्हेंबर २०१९ रोजी पहाटे अनुक्रमे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. दीड दिवसानंतर हे सरकार विसर्जित झाले होते. या सरकार स्थापन होऊन राज्यासह देशात राजकीय भूकंप झाला होता.

मात्र या प्रकरणी आजपर्यंत ना फडणवीस बोलत होते ना अजित पवार. आता त्या दीड दिवसाच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीसच बोलले आहेत. पहाटेचा शपथविधीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पूर्ण कल्पना होती. त्यांच्या संमतीनंच सगळं झालं होतं‘, असा दावा त्यांनी केला आहे. ङ्कडणवीस एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.फडणवीसांनी गोप्यस्ङ्कोट केला की, ‘‘आम्ही निवडून आल्यानंतर आमचे शिवसेनेशी बोलणी सुरू होती. तेव्हा ते काँग्रेस आणि एनसीपीसोबत सत्तास्थापन करण्यासाठी चर्चा करीत असल्याचे समजले. त्यामुळे आम्ही वेगळा पर्याय निवडण्याचे ठरवले.

आम्ही काँग्रेससोबत जावू शकत नव्हतो. त्यामुळे राष्ट्रवादीसोबत आम्ही चर्चा केली. त्यावेळीही प्रस्ताव राष्ट्रवादीकडून आला होता.‘‘ जूना व्हिडिओ जो समोर आला त्यात देवेंद्र फडणवीस म्हणतात, ‘‘येथे कॅमेरा नाही तर बोलायला हरकत नाही. आम्ही सरकार बनवण्यासाठीच्या सर्व पूर्तता पूर्ण केल्या. महामंडळ आणि सत्तास्थापन झाल्यानंतर कुणाला कोणती खाती द्यायची हेही आम्ही ठरवले होते सर्व गोष्टी आम्ही ङ्कायनल केली. राजकारणात असे होत असते.‘‘ देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘राष्ट्रपती राजवट लागली होती, तेव्हा राष्ट्रवादीने जे पत्र दिले होते ते मी लिहीले होते व राष्ट्रवादीमाङ्र्कत ते पाठवले होते. सर्व गोष्टी ङ्कायनल झाल्या होत्या. शिवसेना आमच्यासोबत चर्चेसाठीही तयार नव्हतीच. त्यावेळी राष्ट्रवादीनेही आम्हाला सांगितले होते की, शिवसेना त्यांच्याशी पहिल्या दिवसांपासून चर्चा करीत आहे.‘‘

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *