राष्ट्रीय महामार्गावरील किनवट – हिमायतनगर- महागाव – वारंगा रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावीं

वणी दि. १२ महासागर प्रतिनिधी हिंगोली लोकसभा मतदारसंघातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाची कामे आजही अपूर्ण आहेत. यात किनवट- हिमायतनगर आणि महागाववार ंगा, या रस्त्यांची कामे प्रलंबित असल्यामुळे रस्त्यावर धुळीचे प्रमाण वाढल्याने महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यामुळे महागाव ते वारंगा आणि किनवट ते हिमायतनगर रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती केली जावी. अशी खासदार हेमंत पाटील यांनी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी केली. खासदार हेमंत पाटील यांनी सोमवारी (दि.१२) केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची दिल्ली येथे भेट घेऊन निवेदनाद्वारे मागणी केली. यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पैनगंगा नदीवर होणाऱ्या बंधाऱ्यांवरून विदर्भ व मराठवाडा जोडणारे पूल आणि रस्त्यांसाठी केंद्रीय (उठऋ) रस्ते विकास अंतर्गत निधी उपलब्ध करून दिला जावा . हिंगोली लोकसभा मतदारसंघातून जाणाऱ्या तुळजापूर -नागपूर या राष्ट्रीय महामार्गाच्या कामास गती द्यावी. केंद्रीय रस्ते विकास निधी अंतर्गत हिंगोली लोकसभा मतदारसंघातील रस्त्याच्या कामांना निधी उपलब्ध करून दिला जावा.

वारंगा येथे रहदारीसाठी सर्व्हिस रोड करण्यात यावा. यासह हिंगोली लोकसभा मतदार संघातील विविध रस्ते विषयक मागण्या करण्यात आल्या.याप्रसंगी खासदार हेमंत पाटील म्हणाले की, केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री गडकरी साहेबांची प्रत्येक भेट ही प्रचंड गती देणारी आणि ऊर्जा देणारी सोबतच महत्वपुर्ण मार्गदर्शन करणारी भेट असते. गडकरी साहेबांचे देशातील रस्ते आणि वाहतूक यामध्ये मोठे योगदान आहे. यामुळेच देशातील प्रत्येक गाव हे तालुका, जिल्हा आणि मोठ्या शहरांशी जोडले गेले आहे . यावेळी उभयंतामध्ये हिंगोली लोकसभा मतदार संघातील रस्त्याबाबत विविध विषयावर चर्चा झाली. केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी खासदार हेमंत पाटील यांच्या मागणीला सकारत्मक प्रतिसाद देत तातडीने कामे पूर्ण करण्याचे निर्देश संबंधितांना दिले विशेष म्हणजे किनवट- हिमायतनगर या महामार्गाचे मागील अनेक दिवसापासून प्रलंबित असलेले काम मार्गी लागतील , वारंगा – महागाव या राष्ट्रीय महामार्गाच्या कामास गती मिळेल. हिंगोली लोकसभा मतदारसंघातून जाणाऱ्या तुळजापूर -नागपूर या राष्ट्रीय महामार्गाच्या कामास गती देखील मिळेल. यासाठी केंद्रीय रस्ते विकास निधी अंतर्गत हिंगोली लोकसभा मतदारसंघातील रस्त्याच्या कामांना निधी उपलब्ध करून दिला जावा यासाठी मागणी केली असल्याचे खासदार हेमंत पाटील यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *