पुसद दि. १३ महासागर प्रति. श्री गजानन महाराज प्रगट उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. श्री गजानन महाराजांचा प्रकट दिन शहरातील अनेक ठिकाणी साजरा करण्यात आला श्री पवनसुत हनुमान मंदिर व्यंकटेश नगर मंदिर सौ.विद्या ताई पडवळ, मुंबई यांनी मंदिराच्या प्रांगणात २ दिवस श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण केले, या दिवशी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. यावेळी दोन्ही दिवस भाविकांनी त्यांच्या प्रवचनाचा आस्वाद घेतला.१३ फेब्रुवारीला प्रकट दिनी सुमारे ३ हजार भाविकांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला. नगरच्या गजानन महाराज संस्थानतर्फेही महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.टिळक स्मारकाजवळ भाविकांच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.