निकाल परिषदेचे

विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी आज मतमोजणी पार पडली. भारतीय जनता पक्षाच्या हक्काच्या जागा त्यांना कायम ठेवता आल्या नाहीत. नागपूर शिक्षक मतदारसंघातून दोन वेळेचे आमदार नागो गाणार यांचा सुधाकर आडबोले या महाविकास आघाडीच्या उमेदवाराने पराभव केला. औरंगाबाद शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीचे विक्रम काळे निवडून आले. अमरावती पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचे धीरज qलगाडे यांनी बाजी मारली. त्यांनी भाजपचे दिग्गज उमेदवार आणि माजी राज्यमंत्री रणजित पाटील यांचा पराभव केला. कोकण शिक्षक मतदारसंघातून भाजपला एकमात्र विजय मिळालेला आहे. नाशिक मतदारसंघातून पित्याच्या जागेवर सत्यजीत तांबे यांनी जवळजवळ विजय मिळविला आहे. म्हणजे या निवडणुकीत हक्काची जागा काँग्रेसने हट्टीपणामुळे गमावली आहे. संपूर्ण तांबे परिवार काँग्रेसवादी होता. त्यांचे मामा बाळासाहेब थोरात काँग्रेस पक्षाचे मोठे नेते आहेत. मात्र काँग्रेसने प्रतिष्ठेचा प्रश्न बनवून सत्यजीत तांबे यांना उमेदवारी न देता त्यांच्या वडीलांना उमेदवारी दिली होती. त्याचा ङ्कटका काँग्रेसला बसला आहे. सर्वात मोठा धक्का भारतीय जनता पक्षाला विदर्भातील मतदारांनी दिला आहे. नागो गाणार आता जाणार आहेत, हे आधीपासूनच दिसत होते. भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांनी गाणारांच्या विरुद्ध मते दिली होती.

नागपूरसारख्या बालेकिल्ल्यात भारतीय जनता पक्षाचा पराभव जिव्हारी लागणारा आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र ङ्कडणवीस यांनी या पराभवातून काहीतरी बोध घ्यावा. तिकडे अमरावतीत अटीतटीच्या सामन्यात रणजित पाटील यांच्या सारख्या दिग्गज उमेदवाराला धीरज qलगाडे यांच्यासारख्या नव्या उमेदवाराने पाणी पाजले. आताचे चित्र पाहता भारतीय जनता पक्षाला केवळ कोकणातच एकमेव विजय मिळालेला आहे. सत्यजित तांबे यांना भाजपने पाqठबा दिला असला तरी ते अपक्ष म्हणून निवडून आले आहेत. पण आता त्यांनी भाजपचे समर्थन घेतल्यामुळे काँगेसलाही आपली चूक कळून आली असेल. विधानपरिषदेचे हे निर्णय सत्ताधारी पक्षासाठी निश्चितच qचताजनक आहेत, यात वाद नाही.

महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा आणि हवा कोणत्या दिशेने वाहत आहे याचा अभ्यास करणे भारतीय जनता पक्षाला आवश्यक आहे. आता विधानपरिषदेतील १२ राज्यपाल नियुक्त आमदार आणि इतर काही जागा अजूनही रिक्त आहेत. १२ आमदारांचे भिजत घोंगडे महामहिम राज्यपालांनी तसेच ठेवल्यामुळे आता नव्या आमदारांची नियुक्ती झाल्याशिवाय परिषदेत भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळणे शक्य नाही. यापुढे राज्यात महापालिकांच्या निवडणुका घेण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. मुंबई महानगरपालिका व राज्यातील इतर अनेक महापालिका निवडणुकांची वाट बघत आहेत. भारतीय जनता पक्ष आणि बाळासाहेबांची शिवसेना हा पक्ष यापुढे निवडणुक qजकण्यासाठी कोणती व्यूहरचना करतात याकडे राज्याचे लक्ष लागलेले आहे. सत्ता मिळाली तरी असे धक्के सत्ताधारी पक्षाला मिळणे ही बाब जिव्हारी लागण्यासारखी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *