नवी दिल्ली, दि.१४। प्रतिनिधी नवी दिल्ली आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनी असलेल्या बीसीसीच्या दिल्ली आणि मुंबईतील कार्यालयावर आयकर विभागाने छापेमारी केली आहे. या छापेमारीत कार्यालयातील उपस्थित कर्मचाèयांचे ङ्कोनही ताब्यात घेण्यात आले असून या छापेमारीत ५० हून अधिकारी आणि कर्मचारी सहभागी असल्याची माहिती समोर आली आहे. बीबीसीविरोधात आयकरच्या नियमांचं उल्लंघन झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतर, आयकर विभागानं सर्वेक्षण सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी बीसीसीने द इंडिया क्वेशन नावाचा एक माहितीपट प्रसारित केला होता. गुजरातमध्ये सन २००२ ला दंगल उसळली. त्यावेळी पंतप्रधान मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते.
दंगल घडली तेव्हा मोदी यांची काय भूमिका होती यावर या डॉक्युमेंटरीमध्ये भाष्य करण्यात आले आहे. सोशल मिडिया व ऑनलाईन वाहिन्यांवर ही डॉक्युमेंटरी प्रसारीत करण्यात आली होती. मात्र, देशाची प्रतिमा मलीन होत असल्याच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारनेमात्र, देशाची प्रतिमा मलीन होत असल्याच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारने या माहितीपटावर बंदी आणली. देशातील बहुतांश महाविद्यालये व विद्यापीठांमध्ये ही डॉक्युमेंटरी दाखवण्यात आली. त्यावरुन वादही झाला. तसंच, मुंबईतील कार्यालयातही छापे मारण्यात आले आहेत. बांद्रा कुर्ला येथील कार्यालयात आयकर विभागाचे पथक दाखल झाले असून तक्रारींचा तपास केल्यानंतर सव्र्हे अॅक्शन घेण्यात आली असल्याची माहिती आयकर विभागाने दिली आहे. ही कारवाई प्राथमिक स्तरावरील असल्याचं आयकर विभागानं म्हटलं आहे.