मुंबई- बॉलिवूड अभिनेता जावेद खान अमरोही यांचे निधन झाले. ते ५० वर्षांचे होते. जावेद यांनी जवळपास १५० सिनेमांमध्ये काम केले तसेच टीव्हीच्या दुनियेतही त्यांनी वेगवेगळ्या व्यक्तिरेखा साकारून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. मात्र, त्यांच्या मृत्यूचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. त्यांच्या जाण्याने सिनेजगतात शोककळा पसरली आहे. २००१ मध्ये आलेल्या लगान चित्रपटासाठी जावेद खान अमरोही यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या अकादमी पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते.