प्रतिनिधी पुणे नाशिक महामार्गावर राजगुरुनगर जवळच्या शिरोली, ता. खेड परिसरात खरपुडी ङ्काट्यावर सोमवारी (दि १३) रात्री पाऊणे अकरा वाजण्याचा सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात पुण्याच्या बाजूने वेगात आलेल्या अज्ञात (मqहद्रा एक्स यु व्ही ) कारने १७ महिलांच्या ग्रुपला जोरदार धडक दिली. यात चार ते पाच महिला वाहनाच्या धडकेत रस्त्यावर पडून अक्षरशः चिरडल्या. त्यातील दोन जागीच ठार झाल्या. तीन रुग्णालयात उपचार सुरु असताना मयत झाली. सुनंदा सटवा गजेशी, सुशिला वामन देढे (रा.रामटेकडी शांतीनगर ), इंदुबाई कोंडीबा कांबळे (रा. किरकटवाडी qसहगडरोड पुणे ), सायराबाई प्रभु वाघमारे (रामटेकडी हडपसर पुणे ), या महिला अपघातात मुत्यूमूखी पडल्या. शोभा राहुल गायकवाड, सारीका देवकर, वैषालीवैषाली लक्ष्मण धोत्रे, शोभा सुभाष qशदे या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.अपघातातील मयत व जखमी हे अपघात स्थळापासून जवळच असलेल्या मंगल कार्यालयात वाढपी काम करण्यासाठी स्वारगेट येथून पीएमटी बसने शिरोली येथे उतरल्या होत्या. खरपुडी येथील कृष्णqपगाक्ष मंगल कार्यालयात मंगळवारी असलेल्या लग्न कार्यक्रमात स्वयंपाक करून वाढपी काम करण्यासाठी (केटरिंग)चे काम करण्यासाठी जात असताना घोळक्याने रस्ता क्रॉस करताना पुणे बाजुकडुन एक पांढरे रंगाची महींद्रा एक्सयुव्ही qकवा टियुव्ही या माँडेलची कार भरधाव वेगात आली.