नवी दिल्ली, दि.१४। प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात भारताला जी-२० चे नेतृत्व मिळाले आहे. जी-२० यशस्वी होत आहे, त्यामुळं त्याचं श्रेय पंतप्रधान मोदींना मिळायलाच हवं असं वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं. शाह यांनी आज एएनआय या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. त्यावेळी ते बोलत होते. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत कोणतीही स्पर्धा नाही. मोदींच्या नेतृत्वात देश पुढे जात असल्याचे शाह म्हणाले. बिहार आणि झारखंडमध्ये नक्षलवाद जवळपास संपुष्टात आला आहे. मला खात्री आहे की, छत्तीसगडमध्येही लवकरच शांतता प्रस्थापित करण्यात आम्ही यशस्वी होऊ असा विेशास अमित शाह यांनी व्यक्त केला.