दि.१७। प्रतिनिधी एकनाथ qशदे आणि उद्धव ठाकरे गटाची न्यायालयीन लढाई सुरु असताना इकडे निवडणूक आयोगाने खरी शिवसेना कुणाची आणि धनुष्यबाण कुणाचा, याचा निर्णय दिलेला आहे. शिवसेना हे पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ qशदे गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने दिलाय. ठाकरे आणि qशदे गटाने गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून पक्ष आणि चिन्ह आपल्याच गटाला मिळावं म्हणून निवडणूक आयोगात लाखो शपथपत्रे सादर केली. शेकडो कागदपत्रे निवडणूक आयोगात दिली. त्याच कागदपत्रांच्या आधारे निवडणूक आयोगाने शिवसेना नावासह एकनाथ qशदे यांच्या गटाला धनुष्यबाण चिन्ह देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतलेला आहे. उद्धव ठाकरेंची एक चूक नडली, ज्यामुळे त्यांच्या हातून पक्ष आणि पक्षचिन्ह निसटलं.
शिवसेना पक्षप्रमुख या नात्याने उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पक्षाच्या घटनेत २०१८ मध्ये बदल केला. हा बदल निवडणूक आयोगाला कळवणे कर्मप्राप्त होतं. परंतु उद्धव ठाकरेंनी सुधारित बदल निवडणूक आयोगाला कळवला नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तयार केलेल्या १९९९ च्या पक्षाच्या घटनेत असलेले पक्षांतर्गत लोकशाही निकष बदलण्यात आले. तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी पक्षाच्या घटनेतील बदल निवडणूक आयोगाकडून संमत करुन घेतले होते. पण शिवसेना पक्षाने २०१८ मध्ये पक्षाच्या घटनेत केलेले बदल लोकशाहीशी सुसंगत नाहीत, असे निरीक्षण निवडणूक आयोगाने नोंदवले आहे. पक्षांतर्गत निवडणूक निवडणुका न घेता पदाधिकाèयांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षाने निवडणूक आयोगाचा विेशास गमावला, असं निरीक्षण निवडणूक आयोगाने नोंदवलं आहे.