दि.१६। प्रतिनिधी अभिनेत्री स्वरा भास्कर लग्न बंधनात अडकली आहे. लग्नासंदर्भात तिने ट्विट करुन चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. स्वराने राजकीय कार्यकर्ते फहाद अहमदसोबत लग्न केले आहे. दोघांनी कोर्ट मॅरेज केल्याची माहिती आहे. दोघांच्या जवळच्या मित्रांनी त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करून त्यांना शुभेच्छा देत आहेत. या फोटोंमध्ये स्वराने लाल रंगाची साडी परिधान केल्याचे दिसून येत आहे. रिपोर्ट्सनुसार, कोर्टात स्पेशल मॅरेज ॲक्ट अंतर्गत स्वराने ६ जानेवारीला लग्न केल्याची माहिती आहे. सध्या सर्वत्र लग्नाचा माहोल आहे. अनेकजण विवाहबंधनात अडकत आहेत. यात आता स्वरा भास्करचाही समावेश झाला आहे. स्वराने ट्विटवर व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये आंदोलनातील दोघांची पहिली भेट, त्यानंतर झालेली मैत्री आणि या मैत्रीचे नात्यात झालेले रुपांतर हा संपुर्ण प्रवास दाखवण्यात आला आहे. तिने पोस्टमध्ये लिहिले आहे की, कधी-कधी काही गोष्टी नेहमी आसपास असतात आणि तुम्ही त्यांना खूप दूर शोधत राहतात. आम्ही प्रेमाच्या शोधात होतो, पहिल्यांदा मैत्री मिळाली. मग आम्ही एकमेकांना मिळालो. फहाद झिरार अहमद माझे हृदयात तुझे स्वागत आहे. हे थोडे गोंधळलेले आहे, परंतु ते तुझे आहे. स्वराने व्हिडिओमध्ये तिने फहादसोबत घालवलेले काही खास क्षण शेअर केले आहेत.