महाराष्ट्र

Tiger Is Back! साडेतीन वर्षांच्या शांततेनंतर नवाब मलिकांचा राजकीय पुनरागमनाचा बिगुल; मुंबई महापालिकेच्या रणांगणात कोण टार्गेटवर?

विशेष प्रतिनिधी :मुंबईच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडवणारी हालचाल घडणार आहे.“Tiger is back” या घोषणेसह मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि माजी मंत्री तब्बल साडेतीन वर्षांनंतर प्रथमच माध्यमांसमोर येत आहेत.

ही केवळ पत्रकार परिषद नसून, मुंबई महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत थेट प्रवेशाची घोषणा म्हणून पाहिली जात आहे. त्यामुळे या पत्रकार परिषदेत नवाब मलिक नेमकं कोणावर निशाणा साधणार, कुणाची पोलखोल करणार आणि मुंबईच्या राजकारणात कोणते नवे रणशिंग फुंकणार—याबाबत माध्यमांसह सर्वच राजकीय पक्षांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.

केव्हा आणि कुठे?
आज सायंकाळी ४ वाजता होणारी पत्रकार परिषद
महिला विकास मंडळ सभागृह, मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे.

‘कमबॅक’ केवळ औपचारिक नाही
नवाब मलिक हे आक्रमक भाषणशैली, थेट आरोप आणि सत्ताधाऱ्यांना अस्वस्थ करणाऱ्या राजकीय खेळ्यांसाठी ओळखले जातात. त्यामुळे त्यांचा हा कमबॅक केवळ औपचारिक नसून, मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत राजकीय तापमान वाढवणारा ठरणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका, रणनीती आणि विरोधकांविरोधातली आक्रमक भूमिका या पत्रकार परिषदेतून स्पष्ट केली जाणार असल्याची शक्यता आहे. विशेषतः सत्ताधारी महायुती, भाजप आणि त्यांचे स्थानिक नेते—यांच्या कारभारावर थेट हल्लाबोल होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

कोणाच्या छातीत धडकी भरणार?
मुंबईतील सत्ताकेंद्रे, भ्रष्टाचाराचे आरोप, विकासाचे दावे आणि जमिनीवरील वास्तव—या सगळ्यांवर नवाब मलिक काय खुलासे करणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. “टायगर शांत होता, पण संपलेला नव्हता,” असा संदेश देत ही पत्रकार परिषद निवडणूक प्रचारातील गेमचेंजर ठरू शकते, अशी चर्चा सुरू झाली आहे.

साडेतीन वर्षांनंतर होणारी ही पत्रकार परिषद म्हणजे नव्या राजकीय हल्ल्याची सुरुवात की विरोधकांसाठी इशार्‍याची घंटा आणि मुंबईच्या निवडणूक रणांगणात नव्या वादळाची नांदी

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *