पेण, दि.१९। राजेश प्रधान पेण खोपोली मार्गावरील हेटवणे कॉलनी नजीक इकोकार व ट्रेलरमध्ये झालेल्या भीषण अपघातात ईको मधील ३ जण जागीच ठार झाल्याची घटना घडली असून ४ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. याबाबत सविस्तर वृत्त असे की, पेण तालुक्यातील सावरसई येथून इको गाडीने सात जण खोपोलीच्या दिशेला जात असताना अतिवेगाने ओव्हरटेक करण्याच्याओव्हरटेक करण्याच्या नादात इको गाडीने समोरून येणाऱ्या ट्रेलरला समोरासमोर धडक दिल्याने झालेल्या अपघातात ३ प्रवासी जागीच ठार झाले आहेत. तर ४ चार प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.अपघातग्रस्तीना देवदूत कल्पेश ठाकूर यांनी तातडीने नवी मुंबई येथील रुग्णालयात दाखल केले आहेत. यावेळी घटनास्थळी जिल्हा पोलीस उपाधीक्षक अतुल झेंडे यांच्यासह पेण पोलिस घटनास्थळी हजार होऊन अधिक तपास करत आहेत.