मुंबई, दि.१९। प्रतिनिधी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईतील गोरेगावमध्ये उत्तर भारतीय जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिंदे गट आणि भाजपवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी येत्या काळात सत्ता आली तर तुम्हालाही (उत्तर भारतीय) काहीतरी देऊ. पण आमच्याबरोबर या, आमच्याबरोबर राहा. तरच तुम्हाला काही देता येईल, असं ते म्हणाले. ठाकरे म्हणाले, जेव्हा केव्हाही इतिहासात राजकीय पक्षांमध्ये विवाद झाला, तेव्हा राजकीय पक्षांचे दोन गट झाले आहेत. त्याचं चिन्ह गोठवण्यात आलंय. पण कधी चिन्ह आणि पक्ष एका गटाला देण्यात आलं नाही. पण मी माझं नाव पुढे घेऊन चाललोय. नीच आणि घाणेरडं राजकारण केलं जात आहे. तुम्ही धनुष्यबाण चोरलं पण माझं काही बिघडू शकणार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले. ठाकरे पुढे म्हणाले, मुंबईला दासी बनवण्याचं काम केलं जात आहे. मला उत्तर भारतीयांनी मते दिली. मात्र आता माझ्याकीडून मशाल चिन्ह ही काढून घेण्याचा ते प्रयत्न करत आहेत. राज्याचा पैसाही केंद्राकडे जीएसटीत पडून आहेत. राज्याचा पैसा केंद्राकडे पडून आहेत, अशाने राज्याचा विकास होईल का ? मी मन की बात नाही तर दिल की बात करतो.
दिल की बात करायला मी तुमच्याकडे आलो आहे. भाजपकडून सगळ्या गोष्टी मुंबईच्या बाहेर घेऊन जाण्याचा प्रयत्न होत आहे. मुंबईला दासी करायचं आहे. मात्र आता प्रत्येक संकटात साथ दिली पाहिजे. कोरोनाकाळात मी मुख्यमंत्री होतो. राज्याची, राज्यातल्या जनतेची योग्य काळजी घेतली. इथे रोजगारासाठी आलेल्या लोकांना कोरोनाकाळात गावी जायचं होतं. पण केंद्र सरकराने रेल्वेपण केंद्र सरकराने रेल्वे उपलब्ध करून दिले नाही. तरीही साडेसात लोकांना त्यांची घरी पोहचवलं. आपण सुखात दुखात आपण सोबत राहू. ही शिवसेनेची लढाई नाही, तर लोकशाहीची लढाई आहे . लोकशाही जिवंत ठेवण्याची ही लढाई आहे. ठाण्यात मी लवकरच येईन, कुठे बोलवाल तिथे मी येईन. आपण एकत्र आल्यावर निवडणुकात वेगळं चित्र निर्माण होईल, असे ठाकरे म्हणाले. दूध का दूध पाणी का पाणी नाही झालं तर, दुधात तुम्ही मीठ टाकण्याचं काम केलं आहे, पण या दुधात साखर टाकण्यात काम आपल्याला सगळ्यांना मिळून करायचं आहे. आपण सगळ्यांनी मिळून साखर टाकण्याचं काम करूया, या देशातील लोकशाही जिवंत ठेवण्याची ही लढाई आहे, असे ठाकरे म्हणाले.