मुंबई, दि.२३। प्रतिनिधी टिळकांच्या घराण्याला वापरून सोडले, गिरीश बापटांना ऑक्सिजन नळ्या नाकात लावून प्रचारात उतरवले हा क्रुरतेचा कळस असे वक्तव्य करून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल केला. कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी आज आयोजित प्रचार सभेत उद्धव ठाकरे यांनी ऑनलाईन आज सायंकाळी भाषण केले. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी घणाघात केला. उद्धव ठाकरे म्हणाले, मी मुख्यमंत्री, अजित पवार उपमुख्यमंत्री होते. त्या काळात मी या सर्वांचा उल्लेख मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांनो असा उल्लेख करायचो. त्यानंतर जे काही घडतेय आणि घडले ते मी पाहत आहे. शिवसेनेची लढाई सुरू आहे. त्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कठिण काळात सहकार्य करीत आहेत. राजकारणात निवडणुका जिंकणे व त्याची इर्षा बाळगावी लागते. उद्धव ठाकरे म्हणाले, पोटनिवडणूक बिनविरोध करताना लोकशाहीतील मोकळेपणा शिल्लक राहीला नाही. दोन निवडणुका आल्या. ज्यांना वाटते की, निवडणूक बिनविरोध व्हायला हवे होते. लोकमान्यांच्या घराण्यातील व्यक्तीला दुर्लक्ष करून दुसऱ्यांना उमेदवारी दिली गेली. तिथे सहानुभुती कुठे गेली. टिळकांच्या घराण्याचा वापरून सोडून दिले. उद्धव ठाकरे म्हणाले, उमेदवारी दुसऱ्याला दिल्यानंतर वाईट वाटले व जीव तळमळला. भाजपमध्ये असले तरीही गिरीश बापटांविषयी जीव तळमळला. वयोमान थकवून टाकणारे असते पण काहीवेळा आजारपणा असतो.