टॉप स्टोरी राजकारण

उद्धव ठाकरेंनी ३ लाख कोटींचा भ्रष्टाचार केला – अमित साटम

अमित साटम यांनी पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरेंवर पलटवार केला आहे. सोबतच उद्धव ठाकरे यांनी तब्बल ३ लाख कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप साटम यांनी केला आहे.

अमित साटम यांनी पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले. ठाकरेंनी साटम यांचा उल्लेख चाटम असा केला होता. यावर बोलताना उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली. त्यांनी प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली आहे. त्यांनी मराठी माणसाचा अपमान केला आहे. मी सामान्य कुटूंबातून आलेलो आहे. कोणाच्या आशीर्वादाने आलो नाही, असा टोला साटम यांनी लगावला.तसेच पुढे बोलताना ठाकरेंनी कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केला आहे, असा आरोप साटम यांनी केला.

मुंबई शहरात रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता अशी स्थिती आहे. गेल्या १० वर्षांमध्ये २१ हजार कोटी रुपये खर्च करून रस्त्याची अवस्था बिकट आहे. हे उद्धव ठाकरे यांच्यामुळेच झाले आहे. कोरोना काळात महालक्ष्मी येथील कोव्हिड सेंटर हे बिल्डरच्या भल्यासाठीच उभारण्यात आले होते. बॉडी बॅग, पीपीई कीट असे काहीही त्यांनी सोडले नाही, असा आरोप साटम यांनी केला. तसेच मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी १७०० बार रेस्टॉरंटकडून वसुली केली. ते कोस्टल रोड आम्ही केला, असे म्हणत आहेत. परंतु त्यांच्या काळात हा रोड तयार करण्यासाठी तारखा ठरत नव्हत्या. कोस्टल रोडचं सगळं श्रेय हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आहे, असा दावा करत साटम यांनी उद्धव ठाकरे यांनी ३ लाख कोटी रुपयांचा घोटाळा असा गंभीर आरोप केला. त्यामुळे आता अमित साटम यांच्या आरोपांना ठाकरे गट कसे उत्तर देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *