राजकारण

काल बालकांनी वर्कशॉप केले आणि आज पालकांनी -शेवाळे

शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी खासदार राहुल शेवाळे यांनी ठाकरेंच्या वचननाम्यावर टीका केली आहे. शिवसेनेला वेदना देईल असा वचननामा आहे. त्यांनी हिंदू, मराठी हे शब्द वगळले आहेत. त्यांचा मागचा वचननामा पहिला तर त्यात सगळे शब्द आहेत. यांचा शब्द भ्रष्टाचार मतलब आणि तिजोरी लुटण्याचा आहे. वंदनीय हिंदूहृदय सम्राट हे शब्द वापरले नाहीत. त्यांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे असा उल्लेख केला आहे.

जन्मशताब्दी वर्षीच यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान केल्याची टीका शेवाळे यांनी केली. काल बालकांनी वर्कशॉप केले आणि आज पालकांनी केल्याचा टोला देखील शेवळेंनी लगावला.

बाळासाहेब ठाकरे यांची फसवणूक केलेला हा जाहीरनामा असल्याची टीका राहुल शेवाळे यांनी केली. काल बालकांनी वर्कशॉप केलं आणि आज पालकांनी केलं आहे. वर्कशॉप हा इंग्रजी शब्द वापरला आहे. बाँबे स्कॉटिश शाळेचा जास्त प्रभाव या वचननामामध्ये आहे. यामध्ये ४० टक्के इंग्रजी शब्द यांनी वापरल्याचे राहुल शेवाळे म्हणाले. आज शिवसेना भवन इथं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली.

या पत्रकार परिषदेत त्यांनी मुंबई महापालिकेसाठीचा वचननामा जाहीर केला आहे. एकीकडे मराठी भाषेचा उल्लेख आणि दुसरीकडे दुसऱ्या भाषेचा उल्लेख केला तर कानाखाली मारेल म्हणतात आता कुणाच्या कानाखाली ते मारणार आहेत? असा सवाल शेवाळे यांनी उपस्थित केला. स्वतः मुख्यमंत्री होते तरी २०१७ ला दिलेली आश्वासने यांनी पूर्ण केली नाहीत. कायम भावनिक आवाहन करत आहेत. असे शेवाळे म्हणाले.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *