उद्धव ठाकरेंचे फोटो हटवणे हा हलकटपणा!

मुंबई, दि.२७। प्रतिनिधी आजपासून महाराष्ट्राच्या विधानसभेत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालं आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शिंदे गटाने शिवसेनेच्या विधीमंडळ कार्यलायातून ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे फोटो हटवले आहेत. उद्धव ठाकरेंचे फोटो हटवल्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. शिंदे गटाचं संबंधित कृत्य हा शूद्रपणा आहे, तो हलकटपणा आहे, अशा शब्दांत संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली. इतके घाणेरडी आणि दळभद्री मनोवृत्तीची लोक आमचे सहकारी होते, याचीही आम्हाला आता लाज वाटू लागली आहे, अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली. ते नाशिक येथे पत्रकारांशी संवाद साधत होते.

विधीमंडळ कार्यालयातून उद्धव ठाकरे यांचे फोटो हटवल्याबाबत विचारलं असता संजय राऊत म्हणाले, विधीमंडळातील पक्षाच्या कार्यालयातून उद्धव ठाकरेंचेविधीमंडळ कार्यालयातून उद्धव ठाकरे यांचे फोटो हटवल्याबाबत विचारलं असता संजय राऊत म्हणाले, विधीमंडळातील पक्षाच्या कार्यालयातून उद्धव ठाकरेंचे फोटो काढले असले तरी जनतेच्या हृदयात ठाकरे परिवाराला जे स्थान आहे, ते कसं दूर करणार? हा शूद्रपणा आहे. हा हलकटपणा आहे.तुम्ही आयुष्यभर ज्यांचं मीठ खाल्लं, ज्यांनी तुम्हाला आयुष्यात मान-सन्मान आणि प्रतिष्ठा प्राप्त करून दिला. अगदी बाळासाहेब ठाकरेंपासून उद्धव ठाकरेंपर्यंत ज्यांनी तुम्हाला विविध पदावर नेमलं, म्हणून तुम्ही आज गद्दारीची क्रांती करू शकलात. तुम्ही त्यांचे फोटो काढता याची किंमत तुम्हाला मोजावी लागेल. इतके घाणेरडे आणि दळभद्री मनोवृत्तीचे लोक आमचे सहकारी म्हणून वावरत होते, याची आता आम्हाला लाज वाटू लागली आहे, असंही संजय राऊत म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *