बदलापूर, दि.६,प्रतिनिधी:बदलापूर पूर्व येथील एका पतपेढीवर चोरी झाल्याची घटना घडली आहे. रात्रीच्या सुमारास ही घटना घडली असून चोरांनी पतपेढीमध्ये प्रवेश केला.ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे.
याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार,बदलापुर पूर्व येथील लक्ष्मीबाग सहकारी पतपेढी मर्यादीत, शाखा कार्यालयावर चोरीचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली आहे.पतपेढीचे प्रभारी शाखाधिकारी यांनी बदलापुर पूर्व पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, रात्रीच्या सुमारास दोन अनोळखी व्यक्तींनी शाखेचा मुख्य शटर व काचेचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. या दरम्यान त्यांनी कॅशियर व क्लार्कच्या टेबलवरील ड्रॉवर उघडले व कागदपत्र अस्ताव्यस्त केले. तथापि, पैसे वा इतर मौल्यवान वस्तू चोरांच्या हाती लागल्या नाहीत, अशी माहिती मिळाली आहे.
शाखेतील सिसीटीव्ही फुटेजमध्ये दोन संशयित पतपेढी प्रवेश करताना दिसले नंतर निघून गेले. पतपेढी शाखेत शटर व काचेचा दरवाजा तोडलेला आढळले असून, कक्षातील तिजोरी सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी बदलापुर पूर्व पोलीस ठाण्यात चोरीचा प्रयत्न व तोडफोड म्हणून गुन्हा नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.




