बदलापूर

बदलापूरमध्ये पुन्हा लाजिरवाणी घटना; ४ वर्षांच्या चिमुकलीवर व्हॅन चालकाचा अत्याचार

बदलापूर, दि.२२,प्रतिनिधी:बदलापूर शहरात पुन्हा एकदा माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. अवघ्या ४ वर्षांच्या चिमुकलीवर शाळेच्या व्हॅन चालकाने मारहाण करत लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पीडित मुलीने घरी घडलेला प्रकार सांगितल्यानंतर पालकांनी तातडीने पोलिसांकडे धाव घेतली.पोलिसांनी नराधम व्हॅन चालकाला अटक केली असून अधिक तपास सुरू आहे.

बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. संबंधित शाळेची व्हॅन मुलीला घरी सोडण्यास तब्बल दीड तास उशीर झाला. याबाबत आईने व्हॅन चालकाकडे विचारणा केली असता समाधानकारक उत्तर देण्यात आले नाही. काही वेळानंतर मुलीला घरी सोडण्यात आले. त्यानंतर आईने मुलीकडे विचारपूस केली असता तिने घडलेला धक्कादायक प्रकार सांगितला.त्या नराधमाने अत्याचार केले त्याची माहिती चिमुकलीने दिली.मुलीच्या तक्रारीनंतर कुटुंबीयांनी तातडीने बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी व्हॅन चालकाला अटक केली असून सध्या या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

या घटनेची माहिती समजताच परिसरातील नागरिक संतप्त झाले.या घटनेनंतर परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या कार्यकर्त्या संगिता चेंदवणकर यांनी संबंधित स्कूल व्हॅनची तोडफोड केल्याची घटना घडली.
दरम्यान,यापूर्वीही बदलापूर शहरात लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित करणारी अशीच एक घटना समोर आली होती.त्यामुळे पुन्हा एकदा शाळा प्रशासनाचा निष्काळजीपणावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *