काठमांडू, दि.२८। वृत्तसंस्था नेपाळमध्ये पुन्हा एकदा राजकीय संकट आले आहे. माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्या नेतृत्वाखालील सीपीएन- यूएमएल पक्षाने सोमवारी पुष्प कमल दहल प्रचंड’ यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा पाठिंबा मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे सत्तारुढ आघाडीला मोठा झटका बसला आहे. द काठमांडू पोस्टनुसार, नेपाळची कम्युनिस्ट पार्टी- एकीकृत मार्क्सवादीलेि ननवादी(यूएम-एल) आणि सीपीएन-यूएमएलच्या(सीपीएन- यूएमएल) वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केल्यानंतर याची औपचारिक घोषणा करण्यात आली.
या घटनाक्रमात प्रचंड यांनी कतार दौरा रद्द केला आहे. हा निर्णय सरकारवर घोंगावणारा धोका आणि आगामी ९ मार्चच्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीदरम्यान आला आहे. प्रचंड सर्वात कमी विकसित देशांच्या(एलडीसी) ५ व्या परिषदेत भाग घेण्यासाठी ३ मार्चला कतारला रवाना होणार होते. यात प्रचंड यांनी भाग घेणे आवश्यक विरोधी पक्षाच्या उमेदवाराने झाली आघाडीत बिघाडी नेपाळमध्ये २ महिन्यांपूर्वी प्रचंड यांच्या नेतृत्वाखाली आघाडी सरकार स्थापन झाले होते. सुरुवातीचे अडीच वर्षे प्रचंड पंतप्रधान राहतील आणि नंतर केपी शर्मा ओली पदभार स्वीकारतील,असे ठरले होते. प्रचंड यांनी आघाडीऐवजी अन्य उमेदवार दिल्याने ओली यांनी नाराजी व्यक्त केली होती.