दहशतवादी सरफराजला इंदूरमधून केली अटक

इंदूर, दि.२८। वृत्तसंस्था वाँटेड दहशतवादी सरफराज मेमनला इंदूरमध्ये अटक करण्यात आली. २०१८ मध्ये पीएफआयच्या संशयास्पद कारवायांमध्ये सहभागी होता. मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी सरफराजच्या अटकेला दुजोरा दिला आहे. सरफराज मुंबईत असल्याबद्दल एनआयएने एक दिवस आधीच अलर्ट जारी केला होता. त्यानंतर मुंबई पोलिसांनी इंदूर पोलिसांना अलर्टही पाठवला होता. सरफराज मध्य प्रदेशाचा आहे. त्याने चीन व हाँगकाँगमध्ये ट्रेनिंग घेतली आहे. एनआयएने गुप्त अहवालाच्या आधारे त्याला अटक केली आहे. इंदूरमध्ये मेडिकल स्टोअर चालवत होता: सरफराज मेमन हा इंदूरच्या चंदन नगरचा रहिवासी आहे. तो बऱ्याच दिवसांपासून खजराना परिसरातील मशिदीजवळ राहत होता. त्याने येथे मेडिकल स्टोअरही उघडले होते. त्याला अनेक भाषांचे ज्ञान आहे.

गृहमंत्री मिश्रा म्हणाले की, सोमवारी इंदूर पोलिसांना मुंबई पोलिस आणि एनआयएकडून एक इनपुट मिळाला होता, ज्यामध्ये सरफराज संशयास्पद परिस्थितीत मुंबईत फिरत होता. चिनी महिलेसह ५ विवाह केले होते: डीसीपी इंटेलिजन्स रजत सकलेचा यांनी चौकशी सुरू असल्याचे सांगितले. मुंबई पोलिसांचे पथकही इंदूरला पोहोचले आहे. सरफराजने सांगितले की, त्याने हाँगकाँगमध्ये एका चिनी महिलेशी लग्न केले होते. तिच्याशी वाद झाल्यानंतर तो येथे आला होता. इथे भारतातही त्यांनी ४ लग्ने केली आहेत. याबाबत सर्वांची विचारपूस केली जात आहे. सोमवारी गुप्तचर पथकाने ग्रीन पार्क कॉलनीतील घराची झडती घेतली आणि त्याच्या पालकांची चौकशी केली. याशिवाय आणखी दोघांची चौकशी करण्यात आली. हे लोक सरफराजसोबत अनेक वर्षांपासून येथे राहत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *