-शिव कथावाचक प्रदीप मिश्रा यांचे स्पष्टीकरण
अमरावती, दि.3(प्रतिनिधी): राष्ट्रीय स्तरावरील शिवकथावाचक प्रदीप मिश्रा यांच्या शिवकथा वाचनाचा कार्यक्रम अमरावतीमध्ये होणार असल्याच्या फक्त वावड्याच असल्याचे स्वत: प्रदीप मिश्रा यांनी जाहिर केलेल्या एका व्हिडीओमधून स्पष्ट झाले आहे. आयोजक विकेश गव्हाळे यांनी पत्रकार परिषद घेवून 14 ते 20 मे 2023 दरम्यान नांदगाव पेठ येथील एमआयडीसीच्या भव्य प्रांगणात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती दिली होती. मात्र 3 मार्च रोजी समाजमाध्यमांवर प्रसारित एका व्हिडीओ क्लीपमधून अमरावतीमध्ये तुर्तास कोणतेही आयोजन नसल्याची माहिती प्रदीप मिश्रा यांनी दिली. पंडीत प्रदीप मिश्रा हे राष्ट्रीय शिव महापुराण कथा वाचक असून ते रुद्राक्ष वितरीत करतात. त्यांच्याकडील रुद्राक्ष मिळविण्याकरिता लाखोंच्या संख्येत लोक आयोजनस्थळी गर्दी करतात. याबाबत आयोजक विकेश गव्हाळे अजून काही स्पष्टीकरण दिले नाही.