आज लॉस एंजिलिसमध्ये जगातील सर्वात मोठे स्क्रिनिंग, १६४७ आसनी शो हाऊसफुल्ल

लॉस एंजिलिस । ऑस्कर अवॉर्ड्स २०२३ सोहळ्याच्या काही दिवस आधी आरआरआर हा चित्रपट लॉस एंजिलिस आणि यूएसए मध्ये पुन्हा रिलीज केला जाणार आहे. येथील एका थिएटरमध्ये काही तासांतच या चित्रपटाची १६०० हून अधिक तिकिटे विकली गेली आहेत. संपूर्ण थिएटर हाऊसफुल्ल झाले आहे. याची अधिकृत घोषणा करताना चित्रपटाच्या निर्मात्यांनी सांगितले आहे की, २ मार्च रोजी लॉस एंजिलिस जगातील सर्वात मोठ्या स्क्रीनिंगचे साक्षीदार होईल.

मिळालेल्या माहितीनुसार, चित्रपटाचा मुख्य अभिनेता रामचरण आणि दिग्दर्शक एसएस राजामौली देखील स्क्रिनिंगला उपस्थित राहणार आहेत. १६४७ आसनी शो हाऊसफुल्ल ठठठ चित्रपटाच्या सोशल मीडिया हँडलवर ट्वीट करण्यात आले की, ‘उद्या लॉस एंजिलिस जगातील सर्वात मोठ्या स्क्रीनिंगचे साक्षीदार होईल. १६४७ आसनी असलेला हा शो आधीच हाऊसफुल्ल आहे. एस.एस. राजामौली, एम कीरावानी आणि रामचरण तुमच्या प्रश्नांची उत्तरे देतील.’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *