लंडन, दि.०२। वृत्तसंस्था काँग्रेस नेते राहुल गांधी मंगळवारी एका नव्या लुकमध्ये ब्रिटनला पोहोचले. आपल्या ७ दिवसीय ब्रिटन दौऱ्याची सुरुवात त्यांनी केंब्रिज विद्यापीठात भाषणाने केली. राहुल बिझनेस स्कुलच्या विद्यार्थ्यांना संबोधित करताना म्हणाले – आपण लोकशाही व्यवस्था नसलेल्या जगाची निर्मिती होताना पाहू शकत नाही. त्यामुळे याविषयी आपल्याला नव्याने विचार करावा लागेल. राहुल यांचे भाषण लर्निंग टू लिसन म्हणजे ऐकण्याच्या कलेवर केंद्रीत होते. ते म्हणाले की, ऐकण्याची शक्ती खूप ताकदवान असते. यावेळी त्यांनी लोकशाही व्यवस्थेसाठी नव्या विचारांचे आवाहन केले.
ते म्हणाले की, जगातील लोकशाही वातावरणाला प्रोत्साहन देण्यासाठी नव्या विचारांची गरज आहे. पण ती थोपली जाऊ नये. आपल्या भाषणात राहुल यांनी भारत जोडो यात्रेचाही उल्लेख केला. राहुल गांधी यांचे भाषण ३ टप्प्यांत विभागले होते. त्याची सुरुवात भारत जोडो यात्रेने झाली. राहुल केंब्रिजच्या विद्यार्थ्यांना म्हणाले की, यात्रा एक प्रवास आहे. त्यात लोक स्वतःऐवजी दुसऱ्यांचे ऐकतात. या यात्रेद्वारे त्यांनी भारतातील बेरोजगारी, अन्याय व सातत्याने वाढणाऱ्या असमानविरोधात लक्ष्य खेचले. राहुल यांची भारत जोडो यात्रा ७ सप्टेंबर रोजी सुरू झाली. ३५७० किमीचे अंतर कापताना या यात्रेने १४६ दिवसांत १४ राज्यांतून प्रवास केला. राहुल यांच्या भाषणाच्या दुसऱ्या टप्प्यात दुसऱ्या महायुद्धाचा उल्लेख आहे. त्यात प्रामुख्याने १९९१ मध्ये सोव्हियत युनियनचे विघटन झाल्यानंतर अमेरिका व चीनच्या २ वेगवेगळ्या पैलूंवर केंद्रीत होते. राहुल गांधी म्हणाले – उत्पादनाशी संबंधित नोकऱ्या संपुष्टात आणण्यासह अमेरिकेने ११ सप्टेंबर २००१ च्या अतिरेकी हल्ल्यानंतर स्वतःला मर्यादित केले. याऊलट चीनच्या साम्यावदाी पक्षाशी संबंधित संघटनांच्या माध्यमातून सुसंवादाला प्रोत्साहन दिले.