जगभरात भारतीयांचा डंका

नवी दिल्ली, दि.०८। वृत्तसंस्था भारतीयांची मान पुन्हा एकदा अभिमानाने उंचावली आहे. भारतीय वंशाचे अरुण सुब्रमण्यम यांची दक्षिण आशियाचे पहिले जज म्हणून निवड झाली आहे. याशिवाय ते न्यूयॉर्क जिल्ह्याचे जज म्हणून पदाभार स्वीकारणार आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी हा निर्णय जाहीर केला. मंगळवारी भारतीय वंशाचे अरुण अमेरिकन अरुण सुब्रमण्यम यांना न्यूयॉर्कच्या दक्षिणी जिल्ह्याचे जिल्हा न्यायाधीश म्हणून घोषित केले आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे या खंडपीठावर काम करणारे ते पहिले दक्षिण आशियाई न्यायाधीश बनले आहेत. युनायटेड स्टेट्सने मंगळवारी संध्याकाळी ५८-३७ मतांनी ॲटर्नीकडून सुब्रमण्यन यांच्या नामांकनावर मोहर उमटवण्यात आली आहे. न्यूयॉर्क जिल्हा कोर्टामध्ये अरुण सुब्रमण्यम यांच्या व्यतिरिक्त इतर नावांची देखील शिफारस करण्यात आली होती. मंगळवारी हा प्रस्ताव सिनेटमध्ये पाठवण्यात आला. जो बायडन यांनी अरुण सुब्रमण्यम यांच्या नावावर शिक्कमोर्तब केला आहे. सुब्रमण्यम सध्या न्यूयॉर्कमधील लॉ फर्म सुसमन गॉडफ्रे एलएलपीमध्ये भागीदार आहेत. २००७ पासून ते येथे काम करत आहेत. त्यांनी २००६ ते २००७ या कालावधीत अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती रूथ बेड जिन्सबर्गसाठी लिपिक म्हणून काम केले. यापूर्वी त्यांनी २००५ ते २००६ या काळात न्यूयॉर्कच्या दक्षिणेकडील जिल्ह्यात न्यायमूर्ती जेरार्ड ई लिंचसाठी काम केले. २००४ ते २००५ पर्यंत ते अपील कोर्टाचे न्यायाधीश डेनिस जेकब्स यांचे लॉ लिपिक होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *