शिवशाहीला कार धडकून भीषण अपघात; ठाण्यातील प्रसिद्ध निवेदक दीपक मोरेंचे निधन

मुंबई, दि.०८। प्रतिनिधी सांस्कृतिक, सामाजिक व राजकीय सोहळ्यात खुमासदार सूत्रसंचलनाने उपस्थितांची मने जिंकून घेणारे ठाण्यातील प्रसिद्ध निवेदक दीपेश मोरे यांचे आज महाड येथून ठाण्यात परतत असताना पनवेलच्या चिंचवणजवळ भीषण अपघातात दुर्देवी निधन झाले. “होम मिनिस्टर खेळ पैठणीचा’ हा सांस्कृतिक कार्यक्रम आटोपून मोरे कार चालवत त्यांच्या टीमसोबत येत होते. यावेळी त्यांची कार रस्त्याच्या कडेला उभ्या शिवशाही बसवर मागून धडकली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या अपघातात मोरे यांच्या तीन सहकारी महिला किरकोळ जखमी झाल्या असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

दीपेश मोरे यांच्या आकस्मिक निधनाने ठाण्यातील सांस्कृतिक वतर्ुळात हळहळ व्यक्त होत आहे. ठाण्याच्या देवदया नगर भागात राहणाऱ्या दीपेश मोरे (४६) यांनी “परिणिताज इव्हेंट’च्या माध्यमातून अनेक वर्षांपासून नेटके कार्यक्रमांचे नियोजन व खुमासदार सूत्रसंचालनाच्या माध्यमातून जनमानसात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. मंगळवारी महाड येथे फौजदार भावकी कावळे आयोजित शिमगोत्सवाच्या निमित्ताने “होम मिनिस्टर खेळ पैठणीचा’ व “महाराष्ट्राची शान लावणी’ या कार्यक्रमांचे आयोजन केले होते. त्

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *