उल्हासनगर

उल्हासनगर महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका ज्योत्स्ना सुरेश जाधव यांचे विरोधातील उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर सुनावणी

अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याचे उच्च न्यायालयाने दिले आदेश

उल्हासनगर , दि . ८ प्रतिनिधी : उल्हासनगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०१७ च्या निवडणुकीतील प्रभाग क्रमांक १३ ब च्या नगरसेविका श्रीमती ज्योत्स्ना सुरेश जाधव यांचेवर परमार चाळ,सिटी सर्वे नंबर 18607,ब्लाँक नंबर 521,अंबिका नगर ,स्टेशन रोड, उल्हासनगर -४ येथील अनधिकृत व बेकायदेशीर बांधकामा संदर्भात महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ कलम १० ( १) ( ड ) तरतुदी नुसार कारवाई करण्यात येऊन त्यांचे नगरसेवक पद रद्द करीत अपात्रतेची कारवाई होणेबाबत समाजसेवक मनोज कोरडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका WP/1660/2021 प्रमाणे दाखल करण्यात आली होती .दिनांक. ६ जानेवारी २०२६ रोजी न्यायाधीश भारती डांगरे आणि आर एन लढ्ढा यांच्या खंडपीठा समोर पार पडलेल्या सुनावणीत परमार चाळ,सिटी सर्वे नंबर 18607,ब्लाँक नंबर 521,अंबिका नगर,स्टेशन रोड, उल्हासनगर -४ येथील अनाधिकृत व बेकायदेशीर बांधकामावर कारवाई होणेबाबत उल्हासनगर महानगरपालिकेला निर्देश देण्यात आले आहेत .

श्रीमती ज्योत्स्ना सुरेश जाधव यांचे नगरसेवक पदाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांच्यावर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ कलम १० ( १ ) ( ड ) तरतुदी नुसार अपात्रतेची कारवाई करणे शक्य नसल्याचे न्यायालयाने मत नोंदवत परमार चाळ,सिटी सर्वे नंबर 18607,ब्लाँक नंबर 521,अंबिका नगर,स्टेशन रोड, उल्हासनगर -४ येथील अनधिकृत व बेकायदेशीर बांधकामावर कारवाई करण्याचे आदेश दिले.उल्हासनगर महानगरपालिकेच्या वतीने योगेश विजय पाटील यांनी महानगरपालिकेची बाजू मांडली तर माजी नगरसेविका श्रीमती ज्योत्स्ना सुरेश जाधव यांचे वकील जयंत बारदेशकर यांनी युक्तिवाद करताना परमार चाळ,सिटी सर्वे नंबर 18607,ब्लाँक नंबर 521,अंबिका नगर,स्टेशन रोड, उल्हासनगर -४ येथील अनधिकृत व बेकायदेशीर बांधकामाशी कोणताही संबध नसल्याचे स्पष्ट करीत जोत्स्ना सुरेश जाधव यांनी ते घर बबन केदारे यांना २०१६ साली विक्री केले असल्याचे न्यायालयाला सांगितले.

यावर याचिकाकर्ते मनोज कोरडे यांचे वकिल लक्ष्मण देशमुख यांनी युक्तिवाद करताना श्रीमती ज्योत्स्ना सुरेश जाधव यांचे वकील जयंत बारदेशकर यांना परमार चाळ,सिटी सर्वे नंबर 18607,ब्लाँक नंबर 521,अंबिका नगर,स्टेशन रोड, उल्हासनगर -४ येथील अनधिकृत व बेकायदेशीर बांधकामाशी तुमचा संबध नसताना तुम्ही त्याची काळजी कशाला करता हा प्रश्न विचारीत सदरचे अनधिकृत व बेकायदेशीर बांधकामावर कारवाई करणेबाबत न्यायालयाला विनंती केली.याचिकाकर्ते मनोज कोरडे यांचे वकिलांनी केलेला युक्तिवाद मान्य करीत माननीय न्यायालयाने परमार चाळ,सिटी सर्वे नंबर 18607,ब्लाँक नंबर 521,अंबिका नगर,स्टेशन रोड, उल्हासनगर -४ येथील अनधिकृत व बेकायदेशीर बांधकामावर तात्काळ कारवाई करण्यात यावी असे आदेश दिले असल्याची माहिती याचिकाकर्ते मनोज कोरडे यांनी दिली.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *