उल्हासनगर , दि . ६ प्रतिनिधी : उल्हासनगरमधील राजकीय आणि सामाजिक वातावरणाचे महत्त्व लक्षात घेवून. संत साई छोटूराम यांनी योग्य आणि कार्यक्षम उमेदवार महापालिकेत पाठवा असे आवाहन उल्हासनगर च्या मतदारांना केले आहे. पहिल्यादा साई वसन शाह पंथचे संत साई छोटूराम यांनी मतदारांना अतिशय स्पष्ट आवाहन केले आहे.
विकासाला प्राधान्य द्या जो शहराच्या सर्वांगीण विकासासाठी काम करेल, त्यालाच मतदान करा. जो गोर-गरीब जनतेच्या मदतीसाठी अहोरात्र धावून येईल, अशा उमेदवाराची निवड करा.ज्यांनी विकासाच्या नावाखाली भ्रष्टाचार केला किंवा मतदारांची फसवणूक केली, त्यांना यावेळी त्यांना घरी बसवा , दरम्यान कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सोमवारी उल्हासनगरात प्रचाराचा धडाका लावत त्यांनी उमेदवारांच्या विविध निवडणूक कार्यालयांना भेटी देऊन प्रचाराचा आढावा घेतला.तर प्रभाग क्रमांक १६ मधील उमेदवारांच्या प्रचारासाठी त्यांनी विशेष उपस्थिती लावली.
खासदार शिंदेंनी प्रभाग १६ मधील साई पक्षाच्या खालील उमेदवारांची भेट घेऊन त्यांच्या प्रचाराला बळ दिले राजाभाई जवाहरलाल गेमनानी, दीप्ती दुधानी चेनानी , पिंकी अगीचा थोडक्यात सांगायचे तर संतांच्या आशीर्वादाने आणि मोठ्या नेत्यांच्या सक्रिय सहभागाने उल्हासनगरमधील निवडणुकीचे वातावरण आता चांगलेच तापू लागले आहे. जनतेने सेवाभावी आणि स्वच्छ प्रतिमेच्या उमेदवाराला निवडावे, हाच या भेटीचा मुख्य सूर राहिला.


