उल्हासनगर , दि . १५ प्रतिनिधी : उल्हासनगर शहरात एक ऐतिहासीक कार्यक्रम संपन्न होणार आहे. बुध्द विहार समन्वय समितीच्या वतीने देश पातळीवर बुध्द विहारांचे चौथे राष्ट्रीय अधिवेशन उल्हासनगर येथील शहीद जनरल कुमार वैद्य सभागृह उल्हासनगर – ३ या ठिकाणी २८ फेबृवारी व १ मार्च रोजी संपन्न होणार आहे . या अधिवेशनाला देशभरातुन बौध्द भिक्कु संघासह बौध्द अभ्यासक , पाली भाषेचे अभ्यासक यांच्या सह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहीती या अधिवेशनाचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक सरस्वती बौध्द यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
उल्हासनगर येथे बुध्द विहारांचे राष्ट्रीय अधिवेशन बुध्द विहार समन्वय समितीच्या वतीने आयोजित करण्यात आले आहे . हे अधिवेशन डॉ . भदंत उपगुप्त महास्थविर ( पभरणी ) यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार असुन अधिवेशनाचे उद्घाटक कामगार नेते शामदादा गायकवाड हे असणार आहेत . तर प्रमुख अतिथी म्हणुन भारतीय बौध्द महासभेचे कार्याध्यक्ष डॉ . भीमराव यशवंतराव आंबेडकर हे असुन स्वागताध्यक्ष डॉ . चंद्रकांत साळवे हे राहणार आहेत. सदर अधिवेदन २८ फेबृवारी व १ मार्च या दोन दिवसात शहीद अरुणकुमार वैद्य सभागृह ( टाऊन हॉल ) उल्हासनगर ३ या ठिकाणी अलग अलग सत्रात विविध जागतीक बौध्द विषयावर चर्चा सत्र संपन्न होणार आहे . या अधिवेशनाचे मुख्य आयोजक बुध्द विहार समन्वय समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक सरस्वती बौध्द हे असुन नियोजनाचे काम महेंद्र बुध्दरत्न , मेहराताई गायकवाड ,आय एम मोरे , दिंगंबर हजारे , सीमाताई खैरनार , धर्मदास डवले , सदानंद जाधव , अशोक पंडागळे , सिध्दार्थ साळवे व पारीसनाथ जगताप हे पाहणार आहेत. हे अधिवेशन एक ऐतिहासीक ठरणार आहे .



