नाशिक, दि.०८। प्रतिनिधी मुंबई -आग्रा महामार्गावर इगतपुरीजवळ असलेल्या पंढरपूरवाडीसमोर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील चार जण जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. तर एक जण गंभीर जखमी असल्याची माहिती मिळाली आहे. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ थांबली होती. दरम्यान या मार्गावर वारंवार अपघात होत असल्याने अपघात प्रवण क्षेत्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.