हुकूमशाहीविरोधात जनतेच्या मताचा बुलडोझर फिरवण्याची गरज

मुंबई, दि.०८। प्रतिनिधी धंगेकरांच्या विजयाने जॉर्ज फर्नांडिस यांच्या विजयाची आठवण झाली. विरोधक एकत्र आल्यास आपण जिंकू शकतो. जनतेच्या मताचा बुलडोझर हुकुमशाहीविरोधात फिरवण्याची गरज आता निर्माण झाल्याचे प्रतिपादन उद्धव ठाकरे यांनी केले. कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी आज उद्धव ठाकरे यांची मुंबईतील मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. यावेळी ठाकरे बोलत होते. उद्धव ठाकरे म्हणाले, सखा पाटील या मातब्बर उमेदवाराला त्यावेळी नवखा माणूस असलेल्या जॉर्ज फर्नांडिसने हरवले. पुण्यातील कसब्यात ३० वर्षांपासून भाजपचा बालेकिल्ला भुईसपाट झाला. त्यामुळे विरोधक एकत्र आल्यास आपण जिंकू शकतो. रविंद्र धंगेकर यांना मी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. पंतप्रधान पदाबाबतच्या चर्चांना उद्धव ठाकरे यांनी पूर्णविराम दिला. ते म्हणाले, मी स्वप्नात रमणारा नाही. मुख्यमंत्री पदाची जबाबदारी त्यावेळी माझ्यावर कशाप्रकारे आली. ते मी त्यावेळी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *