मुंबई, दि.०८। प्रतिनिधी नुकत्याच नागालँडमध्ये झालेल्या निवडणुकीत छऊझझ आणि भाजप युतीला पक्षाला बहुमत मिळाले. याच नागालँडमध्ये भाजपप्रणित सरकारला राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिल्याचे समोर आले आहे. त्या वृत्ताला शरद पवार यांनी दुजोरा दिला आहे. ‘आमचा नागालँडच्या मुख्यमंत्र्यांना पाठिंबा आहे. भाजपला नव्हे’, असे स्पष्टीकरण शरद पवार यांनी दिले आहे. शरद पवार पुढे म्हणाले, ‘नागालँडचा निकाल लागल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे ७ विधानसभा सदस्य निवडून आले आहे. निवडणुकीच्या काळात त्या ठिकाणची मुख्यमंत्री यांना आमचा पाठिंबा होता.
आमचा पाठींबा त्या ठिकाणच्या मुख्यमंत्री यांना आहे. त्यामुळे भाजपसोबत युती केली नाही’. ‘आमचा समझौता त्या ठिकाणच्या मुख्यमंत्र्यांसोबत आहे. नागालँड राज्याचे एकंदरीत चित्र बघितल्यानंतर त्या ठिकाणी एक प्रकारचं स्थैर्य येण्यासाठी आमची मदत त्या ठिकाणच्या मुख्यमंत्र्यांना होत असेल तर आमचा त्यांना पाठिंबा आहे. पण पाठिंबा हा भाजप म्हणून नाही, असेही पवार पुढे म्हणाले.