कॅलिफोर्निया, दि.१४। वृत्तसंस्था अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी सोमवारी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांची भेट घेतली. णघणड च्या बॅनरखाली झालेल्या या बैठकीत २०३० पर्यंत ऑस्ट्रेलियाला अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुड्या देण्याचा करार करण्यात आला. यादरम्यान बायडेन म्हणाले की- हा करार इंडो-पॅसिफिक क्षेत्रात स्थिरता आणण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल मानले जाते. या डील अंतर्गत अमेरिका ऑस्ट्रेलियाला यूएस व्हर्जिनिया क्लासच्या ३ अणुऊर्जे वर चालणाऱ्या पाणबुड्या देणार आहे. त्याचबरोबर गरज भासल्यास आणखी २ पाणबुड्यांचा पुरवठा देखील करण्यात येणार आहे. या प्रकल्पातंर्गत ब्रिटन आणि ऑस्ट्रेलिया संयुक्तपणे ८ डडछ-णघणड पाणबुड्या तयार करतील, ज्यामध्ये अमेरिकन तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल.
ब्रिटनला २०३० च्या अखेरीस तीन देशांच्या भागीदारी अंतर्गत तयार करण्यात आलेल्या डडछ-णघणड पाणबुडीची डिलिव्हरी मिळेल. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाला ही पाणबुडी २०४० च्या दशकाच्या सुरुवातीला मिळणार आहे. हे इए आणि ठेश्रश्री-ठेूलश द्वारे संयुक्तपणे बनवले जाईल. ऑस्ट्रेलियन संरक्षण अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, यासाठी सुमारे २४५ अब्ज डॉलर (२०.१९ लाख कोटी रुपये) खर्च येईल.
चार अमेरिकन आणि एक ब्रिटीश पाणबुडी २०२७ पर्यंत ऑस्ट्रेलियन क्रूला प्रशिक्षण देण्यासाठी वेस्टर्न ऑस्ट्रेलियामध्ये तैनात केली जाईल. यादरम्यान बायडेन यांनी या पाणबुड्या अणुऊर्जेचा वापर करतील यावर सतत भर दिला. त्यांच्यावर कोणतीही अण्वस्त्रे असणार नाहीत. १९५० नंतर ही पहिलीच वेळ असेल जेव्हा अमेरिका आपले आण्विक तंत्रज्ञान इतर कोणत्याही देशाला देणार आहे. एक मजबूत भागीदारी म्हणून वर्णन करताना, यूकेचे पंतप्रधान ऋषी सुनक म्हणाले – पहिल्यांदाच असे होईल की, अटलांटिक आणि पॅसिफिक महासागरातील पाणबुड्यांचे ३ फ्लीट शांतता राखण्यासाठी एकत्र काम करतील. त्याचवेळी, ऑस्ट्रेलियाचे संरक्षण मंत्री रिचर्ड मार्ल्स म्हणाले- आम्ही या कराराबद्दल चीनला माहिती शेअर करण्याची ऑफर दिली आहे. मात्र, त्याचे उत्तर आम्हाला माहीत नाही.